वाघापूरच्या सरपंचपदी बापूसो आरडे यांची निवड

मडिगले (जोतीराम पोवार ) : वाघापूर तालुका भुदरगड येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत ज्योतिर्लिंग बिरदेव ग्राम विकास आघाडीने सरपंच पदासह आठ जागांवर विजय मिळवत सत्ता हस्तगत केली विरोधी गटाला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले.

Advertisements

येथील अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत तीन आघाड्या झाल्या प्रत्यक्षात मात्र माजी आमदार के पी पाटील व विद्यमान आमदार प्रकाश आबीटकर यांच्या गटात चूरस पहावयास मिळाली अकरा जागांसाठी तब्बल 33 उमेदवार या निवडणूकीत उमेदवार म्हणून उभे होते सरपंच पदासाठी के पी पाटील गटाकडून बापूसो आरडे तर आबिटकर गटाकडून सौ कमल सुनील जठार या व इतर अपक्ष दोन असे एकूण चार उमेदवार निवडणूक रिंगणात होते मात्र खरी लढत आरडे विरुद्ध जठार अशीच पहावयास मिळाली या लढतीत बापूसो आरडे हे तब्बल 630 इतक्या मताधिक्याने विजयी झाले तर अन्य आठ सदस्य निवडून आल्याने बहुमत सिद्ध झाले विजयानंतर समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी देत गुलालाची उधळण केली विजयी उमेदवार….. प्रभाग क्रमांक 1..1, सौ दिपाली वैभव दाभोळे, 2, सौ. सुनिता बाळासो दाभोळे, 3, सागर गणपती कांबळे, प्रभाग क्रमांक 2..1, नेताजी बाबुराव आरडे, 2, सौ. संगीता शिवाजी शिंदे, 3, सौ जयश्री बाळासो दाभोळे, प्रभाग क्रमांक 3..1, सौ. शोभा धनाजी बरकाळे,2, अनिल पांडुरंग एकल.. प्रभाग क्रमांक ..4..1. युवराज मधुकर आरडे, 2.. सौ . सूमन धनाजी एकल ..3.. सौ . संगीता शिवाजी गुरव……………………….

Advertisements

2017 घ्या पंचवार्षिक निवडणुकीत लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे बापूसो आरडे हे केवळ 18 मतांनी पराभूत झाले होते मात्र यावेळी याच नाराज लोकप्रतिनिधींची माजी आमदार के पी पाटील यांनी एकजूट केल्याने आरडे हे तब्बल 630 मताधिक्याने विजयी झाले याबद्दल जनतेतून समाधान व्यक्त होत आहे

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!