मुरगूड (शशी दरेकर) : खेबवडे ता – करवीर येथे झालेल्या
जिल्हास्तरीय शालेय शासकीय कुस्ती स्पर्धेत विजयमाला मंडलिक गर्ल्स हायस्कूलच्या १२ तर शिवराज विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या ४ मल्लांची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय कुस्ती ( मंडलिक साई आखाडा ) संकुलात सराव करणारे विजयी मल्ल असे : १४ वर्षाखालील मुली – गायत्री घाटगे ( ३९ की ) , १७ वर्षाखालील मुली – प्रतिक्षा सावंत ( ४३ की ), गौरी पाटील ( ४६की) तन्वी मगदुम (५३की), अपेक्षा पाटील ( ६१ ) ,शिवानी मेटकर (६५की ) ,भार्गवी सटाले ( ६९की),१९ वर्षाखालील मुली – प्राजक्ता बारड (५३की), संस्कृती रेडेकर ( ५५की), अपेक्षा खांडेकर (५७ ), श्रुती शिंदे (५९की), संज्योती पाटील (६२की), समृद्धी कीणीकर (७२की), न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल मुरगूड, १७ वर्षाखालील मुले – साईराज वाडकर( ४५की .- ग्रिको-रोमन) , ऋषिकेश डेळेकर – ६०किलो – ( ग्रिको रोमन) , प्रणव मोरे ६० किलो(फ्रि-स्टाइल) १९ वर्षाखालील मुले – हर्षद बच्चे – ६३ किलो (ग्रिको-रोमन)
आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच दादासो लवटे, वस्ताद सुखदेव येरुडकर, दयानंद खतकर, सागर देसाई यांचे मार्गदर्शन तर खासदार संजयदादा मंडलिक, अॅड.विरेंद्र मंडलिक , साई राज्य समन्वयक चंद्रकांत चव्हाण, कार्यवाह आण्णासो थोरवत, डॉ. प्रशांत अथणी, जय शिवराय एज्युकेशन सोसायटी,कोल्हापूर जिल्हा तालीम संघ, राहुल शिंदे (गणेश नागरी सह पत संस्था मुरगूड), मुरगूड नगरपरिषद,मुरगूड यांचे प्रोत्साहन लाभले.