कागल / प्रतिनिधी : कागल तलाठी कार्यालयात काम करणारे संजय भुरले यांना उत्कृष्ट महसूल सेवक म्हणून सन्मानित करण्यात आले .कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांनी केलेल्या सन 2024 ते 2025 या वर्षात उत्कृष्ट कामासाठीचा हा गौरव आहे.
संजय भुरले हे महसूल सेवक म्हणून कागलच्या तलाठी कार्यालयात काम करतात. महसूल वसुली, नैसर्गिक आपत्ती, मदत कार्य, कायदा व सुव्यवस्था तसेच नियमित दैनंदिन कामकाजामध्ये सन 2024 ते 2025 या आर्थिक वर्षामध्ये उत्कृष्ट काम केले आहे. त्याबद्दल त्यांचा कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते येतोचित गौरव करण्यात आला.

नेहमी सामाजिक कार्यात सक्रिय असणारे संजय भुरले यांना प्रशस्तीपत्र व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी कागल चे तहसीलदार अमरदीप वाकडे व अन्य मान्यवर उपस्थित होते.