मुरगूड ( शशी दरेकर ): आगामी गणेशोत्सव व ईद – ए – मिलाद उत्सवाच्या अनुषंगाने मुरगूड पोलीस ठाण्याने मुरगूडसह पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावातून रुट मार्च काढला.
यावेळी एसटी स्टँड मुरगुड परिसर या ठिकाणी दंगल काबू योजना रंगीत तालीम घेण्यात आली .सदर दंगल काबू योजना प्रात्यक्षिक पार पडल्यानंतर मुरगुड एसटी स्टँड ,मुरगूड नाका- मुख्य बाजारपेठ ,कबरस्थान मशीद रोड मुरगूड अशा मार्गे कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी या अनुषंगाने रूट मार्च घेण्यात आला.

सदर दंगल काबू योजना व रूट मार्च करिता मुरगुड पोलीस ठाणे कडील १ अधिकारी , २४ पोलिस अमलदार व आरसीपी मुख्यालय कडील १ अधिकारी, २५ अंमलदार हजर होते. तसेच मुरगूड ग्रामीण रुग्णालय कडील वैद्यकीय अधिकारी व ॲम्बुलन्स पथक, मुरगुड नगरपरिषद कार्यालयाकडील अग्निशामक दल पथक उपलब्ध ठेवण्यात आलेले होते.सदरची रंगीत तालीम घेऊन सर्व अधिकारी, पोलीस अंमलदार व उपस्थित लोकांना रंगीत तालीम चा आशय व उद्देश समजावून सांगितला.
या रुट मार्चचा मुख्य उद्देश नागरीकामध्ये सुरक्षिततेची भावनां निर्माण करणे तसेच संभाव्य शांतता भंग करणाऱ्या घटनानां आळा घालणे हा होता.
नागरीकानीं गणेश उत्सव आणि ईद – ए – मिलादचा उत्सव शांततेत व कायद्याचे पालन करून साजरा करावा असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक मुरगूड पोलीस ठाणेमार्फत करण्यात आले आहे.