मुरगूड(शशी दरेकर): औद्योगिक क्षेत्रातील कंपनी कामगारांसाठी मोफत आरोग्य जनजागृती शिबिरातून कामगारांचे आरोग्यही जपण्याचा ,त्याची काळजी घेण्याचे काम शिपुकडे ग्रुप ऑफ कंपनीज नेहमीचं करत आहे. युवा ग्रामीण विकास संस्थेच्या पुढाकाराने औद्योगिक क्षेत्रात होत असलेले आरोग्य सेवेचे कार्य उल्लेखनीय व स्तुत्य आहे.असे प्रतिपादन शिंपुकडे ग्रुप ऑफ कंपनीजच्या डायरेक्टर सौ.प्रतिभा शिंपुकडे यांनी केले. त्या युवा ग्रामीण विकास संस्था,संचलित स्थलांतरित कामगार लक्षगट हस्तक्षेप प्रकल्प,गोकुळ शिरगाव व कागल एमआयडीसी या प्रकल्पाच्या वतीने शिपुकडे ग्रुप ऑफ कंपनीज,इनर्व्हील क्लब ऑफ कोल्हापूर,इंश्योर आय इन्स्टिट्यूट, मोरया हॉस्पिटल-फौंडेशन ,कोल्हापूर या संस्थांच्या वतीने कामगारांसाठी मोफत आरोग्य जनजागृती शिबीर प्रसंगी बोलत होत्या. गोकुळ शिरगाव एमआयडीसी येथे घेण्यात आलेल्या या शिबिरामध्ये कामगारांना मोफत आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरात १०५ कामगारांची मोफत ऐच्छिक एचआयव्ही, गुप्तरोग, शुगर तपासणी करण्यात आली.तसेच नेत्रतपासणीही मोफत करण्यात आली.त्याबरोबर क्षयरोगविषयी, कोविड नंतर तरुणांपासून -वृद्धापर्यत मधुमेह, रक्तदाब, ह्रदयविकार या समस्येचा धोका ओळखून ह्रदयविकार किंवा अपघातामध्ये बेशुद्ध झाल्यानंतर तात्काळ उपचार मिळण्यासाठी सीपीआर प्रथोपचार याविषयी कामगारांना डॉ. संतोष निबाळकर, विवेक वैजापूरकर, एकता सिस्टर यांनी मोफत प्रथोपचार प्रशिक्षण दिले.
या कार्यक्रमासाठी शिंपुगडे ग्रुप ऑफ कंपनीच्या डायरेक्टर सौ.प्रतिभा शिंपुकडे, इनर्व्हील क्लब ऑफ कोल्हापूरच्या अध्यक्षा सौ.सुवर्णा पाटील, संचालिका मनीषा चव्हाण, सुनीता पाटील, डॉ.स्वप्नील जाधव,एचआर मॅनेजर सचिन पोवार, समुपदेशक दीपक सावंत, सागर परीट, प्रल्हाद कांबळे, नेत्रतज्ञ राकेश कराळकर, सौ.दीपाली सातपुते, शिवप्रसाद पाटील, कुणाल वाईगडे, अक्षय सांगलीकर, प्रवीण पोवार यांच्यासह कामगार वर्ग मोठया संख्येने उपस्थितीत होता.प्रास्ताविक प्रकल्प व्यवस्थापक मोहन सातपुते, तर आभार एचआर सचिन पोवार यांनी मानले.