मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी रेखाताई आनंदराव मांगले तर स्वीकृत नगरसेवकपदी सुनील गणपती मंडलिक व राहूल शामराव शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नगरपरिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या या निवड सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सुहासिनीदेवी प्रविणसिंह पाटील या होत्या.


मुरगूड नगरपरिषदेवर सद्या शिवसेना – भाजपा युतीची सत्ता आली आहे. गुरुवारी सभागृहामध्ये पहिली सभा पार पडली. तत्पूर्वी उपनगराध्य पदासाठी नूतन नगरसेविका रेखाताई आनंदराव मांगले यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यामुळे श्रीमती मांगले यांची उपनगराध्यपदी निवड झाल्याची घोषणा नगराध्यक्षा सुहासिनीदेवी पाटील यांनी केली.

यावेळी नूतन पदाधिकारी व नगरसेवकांचा नगराध्यक्षांच्या हस्ते सत्कार करणेत आला. यावेळी नगराध्यक्षा सुहासिनीदेवी पाटील, उपनगराध्यक्षा रेखाताई मांगले, गटनेते सुहास खराडे, माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके, माजी उपनगराध्यक्ष जयसिंग भोसले, यांच्यासह नगरसेवक व नगरसेविकेंची भाषणे झाली.
यावेळी नगरसेवक, अनिल राऊत, सुनील रणवरे, रणजित भारमल, सत्यजित पाटील, दत्तात्रय मंडलिक,बजरंग सोनुले, राजू आमते,विजय राजिगरे, नगरसेविका गीतांजली आंगज, सुरेखा लोकरे, संजीवनी कांबळे, वैशाली गोधडे, सुजाता पुजारी, निकेलीन बारदेस्कर, विजयमाला शिंदे, संध्या पाटील, संगिता चौगले, यांच्यासह भाजपा शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. निवडी नंतर पदाधिकारी आणि नगरसेवकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केले आणि सभा विसर्जित झाली.