कागल (विक्रांत कोरे) : रंग नात्याचा रंग आपुलकीचा रंग बंधांचा अशा या पारंपारिक पद्धतीने कागल मध्ये रंगपंचिम मोठ्या थाटात साजरी करण्यात आली.
सकाळपासूनच बाल चमूनी पिचकारी हातात घेऊन गल्लोगल्ली हजेरी लावली. एकमेकांच्या अंगावर रंग उडविणे, रंगाचे पाणी मारणे हा रंगपंचमीचा सण खेळण्यास सुरुवात केली. यावर्षी वेगवेगळ्या आकर्षक आकारातील महागड्या पिचका-या बालचमुंच्या हातात पाहायला मिळाल्या.
सकाळी अकरा वाजल्यानंतर मात्र तरुण मंडळाने मोठ्या जल्लोषात रंगपंचमी खेळण्यास सुरुवात केली तरुण-तरुणी गाण्याच्या तालावर तिरकस रंगाची उधळण करीत होते बेवार होऊन ते नाचत होते तर काही ठिकाणी अबबाल-वॄध्दानिही हजेरी लावलीहोती. महिलां ही मोठ्या प्रमाणात सहभागी झालेल्या दिसत होत्या.
शाडू, पिवडी,ऑइल बॉण्ड यासह अन्य रंगांचाही वापर करण्यात आला तर काही ठिकाणी पिवडीची पोतीच्या-पोती आणून रंगाची उधळण केली. गाण्याचा ठेका आणि रंगाची उधळण, पाण्याचा मारा, यासह विलोभनीय दृश्य रंगपंचमीच्या निमित्ताने गल्लोगल्ली, चौका- चौकात दिसत होते.