धनगर समाजातील विद्यार्थ्यांच्या इंग्रजी निवासी शाळांसाठी 19 मे पर्यंत प्रस्ताव सादर करावेत

कोल्हापूर : विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभागाच्या शासन निर्णयान्वये धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्यास मान्यता देण्यात आली आहे. या शासन निर्णयामधील अटी व शर्तींची पूर्तता करुन या योजनेअंतर्गत काम करणा-या शाळांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. हे प्रस्ताव दिनांक 19 मे 2023 पर्यंत समाज कल्याण कार्यालयामध्ये जमा करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.

Advertisements

विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभागाच्या शासन निर्णयान्वये उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमांसाठी इंग्रजी माध्यमाचा वापर होत असल्यामुळे धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणात मागे पडू नये तसेच उच्च शिक्षणाच्या बदलत्या परिस्थितीशी त्यांना जुळवून घेणे शक्य व्हावे, यासाठी धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना शहरांतील इंग्रजी माध्यमाच्या नामांकीत निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्यासाठी योजना सुरु केली आहे. अधिक माहीतीसाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, विचारे माळ, कोल्हापूर येथे (दूरध्वनी क्र. 0231-2651318)संपर्क साधावा, असेही श्री. लोंढे यांनी कळविले आहे.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!
PM KISAN beneficiary status Forts of Chhatrapati Shivaji Maharaj New Mobile Launched in 2023 Highest Dividend Paying Stocks