छ .शिवरायांच्या अश्वारूढ पुतळा उभारणीचे काम लवकरच पूर्ण करणार -नगराध्यक्ष राजेखान जमादार …..
मुरगूड ( शशी दरेकर )
मुरगूड नगरपालिके समोरील शिवाजी उद्यानात असणाऱ्या छ.शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याच्या ठिकाणी सुमारे एक कोटीचा छ. शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा होणार आहे . त्यासाठी उद्यानातील छ .शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा उतरवण्यापूर्वी पुतळ्याची विजयादशमी दिनी विधीवत उत्तरपूजा करण्यात आली .
पालिकेसमोरील छ . शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा उतरवण्यापूर्वी त्याची दुग्धाभिषेक व जलाभिषेक घालून मंत्रोपचाराने शिवभक्त धोंडीराम परीट व सौ.सुनिता परीट यांच्या हस्ते विधीवत पूजा करण्यात आली.पालिकेच्या समोर असणाऱ्या शिवाजी उद्यानातच नव्याने छ . शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा उभारला जाणार आहे . त्यासाठी सुमारे १ कोटीचा खर्च अपेक्षित आहे . मंडलिक युवा प्रतिष्ठानतर्फ हा अश्वारुढ पुतळा देण्यात येणार आहे . तर पालिकेने चबुतऱ्याच्या बांधकामाची जबाबदारी घेतली आहे . लवकरच छ . शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे काम पूर्ण होणार असल्याचे नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी सांगितले .
यावेळी नगराध्यक्ष राजेखान जमादार , उपनगराध्यक्षा सौ . रंजना मंडलिक , पक्षप्रतोद संदीप कलकुटकी, विरोधी पक्षनेता राहुल वडकर , नगरसेवक नामदेवराव मेंडके, धनाजीराव गोधडे, जयसिंगराव भोसले, विशाल सुर्यवंशी, मारूती कांबळे, रवींद्र परीट , बाजीराव गोधडे, सुहास खराडे, नगरसेविका सौ . सुप्रिया भाट, प्रतिभा सुर्यंवंशी, सौं .अनुराधा राऊत, सौ .रूपाली सणगर, सौ .वर्षा मेंडके, सौ .रेखाताई मांगले, सौ . हेमलता लोकरे, यांच्यासह दत्तात्रय मंडलिक, भगवान लोकरे, अनिल राऊत, राजेंद्र भाट, सचिन मेंडके, अक्षय सुर्यवंशी, अमर सणगर, विनायक हावळ, चंद्रकांत जाधव,किरण गवाणकर, बाजीराव खराडे, विकी साळोखे, स्नेहल पाटील, प्रकाश पोतदार, जयवंत गोधडे, रणजीत निंबाळकर ,अनिकेत सूर्यवंशी, मारुती शेट्टी, अमर कांबळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते .