गावात कायदा सुरक्षा राखण्याचे केले पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी आवाहन

कागल (प्रतिनिधी) – कागल पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी रणदेवीवाडी या ठिकाणी गाव भेट दिली. गाव भेटी दरम्यान गावचे सरपंच राहुल खोत, उपसरपंच सुधाकर खोत व इतर सदस्य हजर होते. गाव भेटीदरम्यान गावातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याबाबत सूचना केल्या तसेच गावात सीसीटीव्ही कॅमेरे मेन चौकामध्ये लावून घ्यावेत असे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार सांगितले.

त्याचबरोबर गावातील व्हाट्सअप जे ग्रुप असतील त्यावरती कोणताहीआक्षेपार्य पोस्ट वायरल होणार नाही व कोणी स्टेट्स ठेवणार नाही याची खबरदारी घेण्याची सूचना दिली. त्यानंतर महाराष्ट्र शासन यांचा सुंदर वसुंधरा अंतर्गत रणदेवीवाडी ग्रामपंचायत समोरील मोकळ्या जागेत वृक्षारोपण करण्यात आले.

One thought on “वसुंधरा योजने अंतर्गत रणदेवीवाडी येथे वृक्षारोपण”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!