पर्यायी रस्ता मिळेपर्यंत शांत बसणार नाही; तामगाव ग्रामस्थांचा प्रशासनाला इशारा

गोकुळ शिरगाव (सलीम शेख ) : नेर्ली-तामगाव ते उजळाईवाडीला जोडणारा रस्ता बंद केल्यामुळे आणि त्याला कोणताही पर्यायी मार्ग उपलब्ध करून न दिल्यामुळे तामगावच्या ग्रामस्थांनी काल (रविवार) ग्रामपंचायत कार्यालयात तीव्र संताप व्यक्त केला. जोपर्यंत पर्यायी रस्ता मिळत नाही, तोपर्यंत शांत बसायचे नाही, असा निर्धार यावेळी ग्रामस्थांनी केला. या पार्श्वभूमीवर तहसीलदार स्वप्निल रावडे, प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, मंडलाधिकारी … Read more

शेतकऱ्यांसाठी दिलासा: कोल्हापुरात ‘लिंकिंग’शिवाय दर्जेदार खते मिळणार

कोल्हापूर: आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना दर्जेदार आणि ‘लिंकिंग’शिवाय कृषी निविष्ठा (खते, बियाणे, कीटकनाशके) मिळाव्यात यासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी उत्पादक आणि विक्रेत्यांना सक्त सूचना दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या खतपुरवठा आढावा बैठकीत ते बोलत होते. सध्या कोल्हापूर जिल्ह्यात मंजूर कोट्यानुसार १०० टक्के खतांचा पुरवठा झाला असून, युरिया, डीएपी, एमओपी, संयुक्त खते आणि एसएसपी यांचा मुबलक … Read more

डॉ. जब्बार पटेल यांना राजर्षी शाहू पुरस्कार जाहीर

चित्रपट आणि नाट्य क्षेत्रातील योगदानाला सलाम कोल्हापूर: राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टने सन 2025 साठीचा 39 वा राजर्षी शाहू पुरस्कार पद्मश्री डॉ. जब्बार पटेल यांना प्रदान करण्याची घोषणा केली आहे. कोल्हापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ही माहिती दिली. डॉ. पटेल यांना चित्रपट आणि नाट्य क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी हा पुरस्कार दिला … Read more

वाचा गहिनीनाथ समाचार अंक ३९ ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक ३९ दिनांक ९-०६-२०२५ रौप्यमहोत्सवी गहिनीनाथ समाचार गेली २५ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २१ वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या … Read more

निधन : एम. व्ही. कांबळे

मुरगूड,ता.८ : येथील दलितमित्र एम.व्ही.कांबळे (वय ७९ ) यांचे निधन झाले. ते सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी होत. त्यांच्या मागे,पत्नी, मुले,सूना,नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता.९) आहे.

निधन वार्ता – यशवंत पोवार

श्रीपेवाडी ता. निपाणी येथील प्रगतशील शेतकरी यशवंत जानबा पोवार ( वय ८९ ) यांचे अल्पशा आजाराने रविवार दि. ८/६/२०२५ रोजी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुलगे, दोन मुली , सुना , नातवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवार दि. ९/६/२०२५ रोजी सकाळी ९ वाजता श्रीपेवाडी येथे आहे.

तामगाव ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल पुजारी अपात्र

गोकुळ शिरगाव (सलीम शेख ) : करवीर तालुक्यातील तामगाव ग्रामपंचायतीचे सदस्य विठ्ठल पुजारी यांना शाळेच्या सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी अपात्र घोषित करण्यात आले आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८-कलम १४ नुसार, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी हे आदेश दिले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, तामगाव येथील हेमंत राजेंद्र पाटील, अनिल शिवगोंडा पाटील आणि प्रकाश बंडू जोंधळेकर … Read more

मुरगूडात राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा

नाचणारा घोडा, ध्वज पथक, मर्दानी खेळ आणि लाईट शो ठरले खास आकर्षण मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगुड शहर येथील संयुक्त शिवप्रेमी आणि राज्याभिषेक समिती मुरगूड यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन दरवर्षी मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा केला जातो. यंदाचे हे चौथे वर्ष दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हा सोहळा हजारो लोकांच्या गर्दीमध्ये उत्साहात संपन्न झाला. पश्चिम … Read more

कोल्हापुरात शिवरायांच्या कर्तृत्वाला जिवंत देखाव्यातून उजाळा

कोल्हापूर, 6 जून: छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील एक महत्त्वाचा अध्याय, शिवराज्याभिषेक दिन, आज कोल्हापुरात कागलकर वाड्याच्या प्रांगणात अभूतपूर्व उत्साहात साजरा झाला. या निमित्ताने शिवशक राजदंड स्वराज्यगुढीची स्थापना करण्यात आली, जी शिवरायांच्या सार्वभौमत्वाची आणि रयतेच्या कल्याणाची प्रतीक आहे. सनई आणि पोवाड्यांच्या निनादात पार पडलेल्या या सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचा मुख्य … Read more

सांगाव येथे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते ‘महाबीज’ सोयाबीन बियाणे वाटप; शेतकऱ्यांशी साधला संवाद

कोल्हापूर: कागल तालुक्यातील सांगाव येथे शुक्रवारी कृषी विभागामार्फत एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदानावर फुले किमया या उन्नत सोयाबीन वाणाच्या ‘महाबीज’ बियाण्यांचे वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते हे बियाणे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी उपस्थित लाभार्थी शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी बीजप्रक्रियेचे महत्त्व … Read more

error: Content is protected !!