मुरगूड मधील मुख्य रस्त्याच्या दुरुस्ती साठी मंडलिक गटाच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड मधील नाका नंबर १ ते सर पिराजी तलावा पर्यंत चा मुख्य रस्ता दुरुस्त व्हावा म्हणून येथील मंडलिक गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.      हा रस्ता मोठ्या रहदारीचा असून याच रस्त्यावर ग्रामीण रुग्णालय ,नगरपरिषद , एस टी बस स्थानक, शिवतीर्थ , तुकाराम चौक हुतात्मा स्मारक, मुरगूड विद्यालय,शिवराज विद्यालय इत्यादी स्थळे … Read more

मारूती चौगले यांचा ‘ सोन्या ‘ बैलाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी उत्तरकार्य विधीसह अन्नदान 

मुरगूड ( शशी दरेकर ): चौगले कुटूंबाची प्राणीमात्रावर असाणाच्या प्रेमाची प्रचिती          मुरगूड येथील देशमुख कॉलनीत राहणाऱ्या मारूती शंकर चौगले या शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा अविभाज्य घटक बनलेल्या व त्याच्यावर जिवापाड प्रेम करीत असलेल्या ‘ सोन्या ‘ नावाच्या बैलाचा मृत्यू झाला. सारे कुटुंब शोकाकुल झाले. त्याच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आज (दि – १० ) रोजी फोटो पूजन … Read more

कर्मचारी राज्य विमा महामंडळाकडून (ESIC) SPREE 2025 योजना सुरू

पुणे : कर्मचारी राज्य विमा महामंडळाने (ESIC) सामाजिक सुरक्षा व्याप्ती वाढवण्यासाठी आणि नियोक्ते व कर्मचाऱ्यांच्या नोंदणीला प्रोत्साहन देण्यासाठी “SPREE 2025” (नियोक्ते आणि कर्मचाऱ्यांच्या नोंदणीला प्रोत्साहन देण्यासाठी योजना) ही नवीन योजना मंजूर केली आहे. हिमाचल प्रदेशातील शिमला येथे झालेल्या महामंडळाच्या १९६ व्या ESIC बैठकीत, कामगार व रोजगार तसेच युवा व्यवहार व क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया … Read more

जेफरीजकडून Asian Paints Share ला ‘डबल अपग्रेड’

‘फॉलिन एंजेल’ कंपनीची ‘कॉन्ट्रारियन कमबॅक’ची शक्यता, तीन प्रमुख कारणे मुंबई: आंतरराष्ट्रीय ब्रोकरेज फर्म जेफरीजने Asian Paints Share ला ‘अंडरपरफॉर्म’ वरून थेट ‘बाय’ रेटिंग देऊन डबल अपग्रेड दिले आहे. प्रति शेअर 2,830 रुपये असे नवीन लक्ष्य निश्चित केले आहे, जे सध्याच्या पातळीपासून 13% वाढ दर्शवते. कंपनीसाठी हा ‘कॉन्ट्रारियन कमबॅक’ (उलट दिशेने जोरदार पुनरागमन) असू शकतो, असे … Read more

मुरगूड येथे पत्रकार भवन बांधकाम शुभारंभ संपन्न

मुरगूड ( शशी दरेकर ): मुरगूडमध्ये नियोजित पत्रकार भवन उभारणीला नागरीकानी सहकार्य करण्याचे आवाहन मुरगूड शहर पत्रकार संघाच्या बहुप्रतिक्षित पत्रकार भवन बांधकामाचा शुभारंभ नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक आतिश वाळुंज यांच्या हस्ते करण्यात आला. पत्रकार भवन उभारणीला दानशूर लोकांनी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. रवींद्र शिंदे होते.                  लोकवर्गणीतून … Read more

मुरगूडजवळ गटारीत पडून ५८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड पोलीस ठाणे हद्दीत मुरगूड ते चिमगाव रस्त्यालगत गटारीत पडून एका ५८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. बाळासो शिवाप्पा लोंढे (वय ५८, रा. सोनगे, ता. कागल, जि. कोल्हापूर) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी अकस्मात मयत रजि. नं. ३१/२०२५ भारतीय नागरिक सुरक्षा संहिता १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली … Read more

वाचा गहिनीनाथ समाचार अंक ४३ ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक ४३ दिनांक ०७-०७-२०२५ रौप्यमहोत्सवी गहिनीनाथ समाचार गेली २५ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २१ वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या … Read more

आषाढी एकादशी निमित्य विठुरायाच्या पालखीचे मुरगूड मध्ये ठिकठिकाणी भक्तीमय वातावरणात स्वागत

मुरगूड ( शशी दरेकर ):  आज देवशयनी आषाढी एकादशी.मुरगूड मधील विठ्ठल मंदिरा पासून विठ्ठल रूक्मिणी ची शानदार पालखी काढण्यात आली. अत्यंत भक्तिमय वातावरणात पालखीचे ठिक-ठिकाणी स्वागत करण्यात आले.   ” विठु माऊली तू माऊली जगाची   राजा तू पंढरीचा..राजा तू पंढरीचा    अवघे गर्जे पंढरपूर, चालला विठू नामाचा गजर.” अशा भक्तिगीतांच्या तालावर विठ्ठल भक्तांनी शहरातील … Read more

विठ्ठला भवती संत सारे झाले गोळा  फुलला आषाढीच्या भक्तीचा मळा

मुरगूड ( शशी दरेकर ) : आषाढी एकादशी म्हणजे विठ्ठलाच्या भक्तीचा उत्सव. सारा महाराष्ट्र त्यात डुंबून गेला आहे.प्रत्येक भक्त म्हणजे माऊली विठ्ठलाचे चरण समजून एकमेकांचे चरण स्पर्श करण्याची ही महान परंपरा फक्त या पवित्र उत्सवात पाहायला मिळते.  हे संस्कार विद्यार्थ्यांत सुद्धा भिनले पाहिजेत म्हणून हा उत्सव भक्तीभावाने त्याच उत्साहाने  शाळांमधून साजरा केला जातो.त्यामध्ये शिक्षक व … Read more

आता सोपे झाले ! परिवहन वाहनांच्या ‘Fitness Certificate’ नूतनीकरणासाठी कोल्हापूर RTO शी संपर्क साधा

कोल्हापूर : आपले परिवहन वाहन असेल आणि त्याचे योग्यता प्रमाणपत्र (Fitness Certificate) नूतनीकरणासाठी प्रलंबित असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे! वेग नियंत्रकाच्या तांत्रिक अडचणीमुळे थांबलेली ही प्रक्रिया आता पुन्हा सुरू झाली आहे. कोल्हापूर प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी सर्व वाहनधारकांना तातडीने आरटीओ कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. परिवहन आयुक्त कार्यालयाच्या नव्या आदेशानुसार, योग्यता … Read more

error: Content is protected !!