निधन वार्ता : श्रीमती हौसाबाई मारुती भूते

मुरगूड :मुरगूड येथील श्रीराम मंगल कार्यालय व भूते बंधू मंडप डेकोरेशनचे मालक रामचंद्र व विठ्ठल भूते यांच्या मातोश्री श्रीमती हौसाबाई मारुती भूते (वय ८३ ) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, एक मुलगी, सूना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवार दि. २५ जुलै रोजी सकाळी ९ वाजता मुरगूड येथे आहे.

तरुणांनी शिक्षण सोडून कोणत्याही वाममार्गाला जाऊ नये : स.पो. नि. शिवाजी करे

तरुणांच्या आयुष्यामध्ये नशा नको तर दिशा हवी मुरगुड ( शशी दरेकर ) : तरुणांच्या आयुष्यामध्ये नशा नको तर दिशा हवी असे प्रतिपादन मुरगूड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. शिवाजी करे यांनी केले. ते सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय, मुरगुड मध्ये अंतर्गत तक्रार निवारण समितीमार्फत आयोजित केलेल्या अमली पदार्थ विरोधात झिरो मिशन अंतर्गत आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये … Read more

कागल तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

कागल / प्रतिनिधी : कागल तालुक्यातील 83 ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण सोडत पद्धतीने जाहीर करणेत आले. तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी हे आरक्षण जाहीर केले. जाहीर केलेली आरक्षण सोडत ही सन 2025 ते 2030 या पंचवार्षिक कालावधीसाठी आहे.           कागल तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी सरपंच पदाची निवडणूक लढविण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधले होते. पण आरक्षण ऐकताच काही ठिकाणी खुशी तर … Read more

सर पिराजीराव प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन संपन्न

कागल प्रतिनिधी : सहकार ही धनदांडग्यांची चळवळ नसून सामान्य माणसाची चळवळ आहे ती टिकायला हवी. खूप वर्षाच्या प्रयत्नानंतर या संस्थेचे हे शिखर तयार झाले आहे. सर पिराजीराव पतपेढीची यापुढेही अधिक भरभराटीला व्हावी. असे प्रतिपादन माजी आमदार संजय बाबा घाटगे यांनी केले. येथील सर पिराजीराव प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन  माजी आमदार संजय बाबा … Read more

मुरगूडच्या रौप्यमहोत्सवी श्री . व्यापारी नागरी सह .पतसंस्थेला १८ लाख १३ हजार नफा -सभापती किरण गवाणकर.

मुरगूड ( शशी दरेकर ): मुरगूड तालुका कागल येथिल विश्वनीय संस्था म्हणून नावारूपास आलेली व सर्वपरिचीत आणि जिव्हाळ्याची पतसंस्था म्हणून ओळखली जाणारी रौप्यमहोत्सवी श्री. व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेला १८लाख१३ हजार नफा झालेची माहिती सभापती श्री. किरण गवाणकर यानी दिली . सभेच्या सुरवातीला दिपप्रज्वलन सभासद सुरेश जाधव , शिवाजी खंडागळे, तसेच प्रतिमापूजन मारुती घोडके, सुरेश परीट … Read more

कसबा सांगाव येथील रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात नागरिकांचे झाडे लावून अभिनव आंदोलन

कागल : कागल तालुक्यातील कसबा सांगाव येथे संतप्त नागरिकांनी रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात अनोखे आणि प्रतीकात्मक आंदोलन केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आणि यामुळे नागरिकांना होणारा त्रास अधोरेखित करण्यासाठी, आंदोलकांनी चक्क रस्त्यातील खड्ड्यांमध्ये झाडे लावून आपला निषेध व्यक्त केला. गेल्या अनेक महिन्यांपासून कसबा सांगाव येथील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, जागोजागी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालक आणि पादचारी … Read more

इचलकरंजीतील दोन सराईत चोरटे कोल्हापूर पोलिसांच्या जाळ्यात

७ लाखांचा मुद्देमाल जप्त कोल्हापूर (सलीम शेख ) : इचलकरंजी आणि कागल परिसरात घरफोडी व चोरीचा धुमाकूळ घालणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूरच्या पथकाने अटक केली आहे. या आरोपींकडून सोन्या-चांदीचे दागिने आणि मोटरसायकल असा एकूण ७ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, त्यांच्या अटकेमुळे दोन घरफोडी व एक मोटरसायकल चोरी असे … Read more

स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये मुरगूड नगरपरिषदेचा पुन्हा एकदा रोवला झेंडा

मुरगूड ( शशी दरेकर ) : स्वच्छ सर्वेक्षण २०२५ कचरा मुक्त शहर मानांकन व हागणदारी मुक्त शहरामध्ये मुरगूड नगरपरिषदेने उच्चतम कामगिरी करुन देशात २०३५ शहरांपैकी २६ वा व २० हजार पेक्षा कमी लोकसंख्येच्या गटा मध्ये राज्यात १६३ शहरांपैकी ४ था क्रमांक पटकावुन आपल्या स्वच्छ सर्वेक्षणमध्ये योगदान अभादित केले आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२४ २५ मार्च ते … Read more

बदल स्वीकारून माध्यमांचे महत्त्व वृद्धिंगत करूया… कोल्हापूरच्या पत्रकार कार्यशाळेतील ‘सकारात्मक’ सूर

कोल्हापूर : माध्यमांच्या बदलत्या स्वरूपाला सामोरे जाण्यासाठी आणि स्वतःचे अस्तित्व अधिक ठसठशीत करण्यासाठी नव्या बदलांचा स्वीकार करणे अत्यावश्यक आहे, यावर कोल्हापूर येथे झालेल्या पत्रकार कार्यशाळेत एकमत झाले. “बदल स्वीकारून माध्यमांचे महत्त्व वृद्धिंगत करूया,” असा सकारात्मक सूर या कार्यशाळेत उमटला. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयातर्फे आयोजित या पहिल्या टप्प्यातील कार्यशाळेत शासनमान्य दैनिके व … Read more

Air India flight crash pilot अहमदाबाद विमान अपघाताबाबत वैमानिकांच्या भूमिकेशी संबंधित अहवाल भारताने फेटाळला

अहमदाबाद: गेल्या महिन्यात अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडियाच्या भीषण विमान अपघाताबाबत वैमानिकांच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याचा दावा करणारा अहवाल भारताने फेटाळून लावला आहे. विमान अपघात अन्वेषण विभागाने (AAIB) याबाबत स्पष्टीकरण दिले असून, Air India flight crash pilot वैमानिकांवर दोषारोप करणारे दावे निराधार असल्याचे म्हटले आहे. १२ जून रोजी अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या बोईंग ७८७-८ … Read more

error: Content is protected !!