वाचा गहिनीनाथ समाचार अंक ४६ ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक ४६ दिनांक २८-०७-२०२५ रौप्यमहोत्सवी गहिनीनाथ समाचार गेली २६ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २२ वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या … Read more

‘टक्केवारी खातोय’ घोषवाक्यांनी महापालिका दणाणली !

‘आप’चे लाचखोरीविरोधात तीव्र आंदोलन; नागरिकांमध्ये संताप कोल्हापूर (२९ जुलै) : कोल्हापूर महानगरपालिकेत ड्रेनेज प्रकल्पाच्या कामातील लाचखोरीच्या आरोपांवरून ‘आम आदमी पक्षा’ने (आप) महापालिका मुख्यालयासमोर जोरदार आंदोलन केले. एका ठेकेदाराने बिले पास करण्यासाठी अधिकाऱ्यांनी पैशांची मागणी केल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर, ‘आप’ने भ्रष्ट महापालिका यंत्रणेविरोधात आपला संताप व्यक्त केला. आंदोलकांनी महापालिकेसमोर नोटांचा प्रतिकात्मक पाऊस पाडला, ज्यामुळे लाचखोरीचे स्वरूप … Read more

स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या 77 व्या जयंती निमित्त मुरगूड मध्ये सानिका स्पोर्ट्स फौडेशन यांच्या मार्फत शालेय साहित्य व खाऊ वाटप

मुरगूड ( शशी दरेकर ): मुरगूड येथे स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या 77 व्या जयंती निमित्त सानिका स्पोर्ट्स फौडेशन, मुरगूड यांच्या वतीने एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात लहान मुलांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे हे शाहू साखर कारखान्याचे संस्थापक होते . आणि त्यांच्या जयंती निमित्त … Read more

जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदलीसाठी शाळा प्राधान्यक्रम नोंदणीस प्रारंभ

कोल्हापूर : ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील शिक्षकांची ऑनलाईन बदली प्रक्रिया कार्यान्वित झाली आहे. या अनुषंगाने, ‘बदली अधिकार पात्र’ (टप्पा क्रमांक ४) मधील शिक्षकांना दिनांक २८ ते ३१ जुलै २०२५ या कालावधीत बदलीसाठी शाळांचा प्राधान्यक्रम ऑनलाईन नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले … Read more

श्रावण षष्ठी यात्रेनिमित्त वाहतूक नियमनासंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा

कोल्हापूर : श्री क्षेत्र जोतिबा (वाडी-रत्नागिरी) येथे ३० जुलै ते ३१ जुलै २०२५ दरम्यान होणाऱ्या चोपडाई देवीच्या श्रावण षष्ठी यात्रेनिमित्त वाहतूक नियमनासंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्याधिकारी आणि पोलीस अधीक्षक कार्यालयाने भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत. वाहतूक बदल आणि प्रवेश बंदी : एकेरी वाहतूक मार्ग : नो … Read more

नॅनो खते : विषमुक्त शेती आणि आत्मनिर्भर कृषीचा मार्ग

कोल्हापूर: जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज कोल्हापूरमध्ये ‘नॅनो खते जागरूकता अभियाना’चा शुभारंभ केला, यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना स्वदेशी नॅनो खतांचा वापर करून विषमुक्त शेती साधण्याचे आणि ‘आत्मनिर्भर भारत – आत्मनिर्भर कृषी’ संकल्पना साकारण्याचे आवाहन केले. कृषी विभाग, जिल्हा परिषद कृषी विभाग आणि इफको यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे … Read more

गोकुळ शिरगावजवळ सर्विस रोडवर ट्रक पलटी; कोणतीही जीवितहानी नाही

गोकुळ शिरगाव (सलीम शेख ) : राष्ट्रीय महामार्गावर कागलहून कोल्हापूरच्या दिशेने येणाऱ्या आले वाहतूक करणाऱ्या एका ट्रकला आज गोकुळ शिरगाव येथील जैन मंदिरासमोर अपघात झाला. राष्ट्रीय महामार्गावरून बाजूला घेत असताना अचानक ट्रक घसरून पलटी झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून, किरकोळ नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा ट्रक आल्ले घेऊन जात होता. गोकुळ … Read more

राजे विक्रमसिंह घाटगे हे शाहूराजांच्या रक्ताबरोबर विचाराचे व कर्तुत्वाचे खरे वारसदार – व्ही. जी. पोवार

विक्रमसिंह घाटगे हे छत्रपती शाहू महाराज यांच्या केवळ रक्ताचेच नव्हे तर कर्तुत्वाचे व विचाराचे खरे वारसदार असल्याचे प्रतिपादन मुख्याध्यापक व्ही.जी.पोवार यांनी केले.      व्हन्नूर ता.कागल येथील श्री.दौलतराव निकम माध्यमिक विद्यालयात राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या जयंती निमित्तच्या समारंभात ते बोलत होते.         श्री पोवार यांनी राजे विक्रमसिंह घाटगे यांनी बहुजन मुलांच्या शिक्षणासाठी राजेंनी राबवलेले विविध उपक्रम,साखर … Read more

निधन वार्ता : श्रीमती इंदूताई महादेव खैरे यांचे निधन

मुरगूड येथील श्रीमती इंदूताई महादेव खैरे ( वय ८७ ) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुलगे, एक मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे. निवृत अभियंता सुरेश खैरे यांच्या त्या आई होत.

निधन वार्ता : रामराव सासणे यांचे निधन

मुरगूड येथील शिवचरित्र व्याख्याते व दिवंगत लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांचे जूने सहकारी रामराव बाबुराव सासणे (वय ८७ ) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या मागे  पत्नी, दोन मुले, भाऊ, सूना व नातवंडे असा परिवार आहे. ॲड राणाप्रताप सासणे यांचे ते वडिल होत.

error: Content is protected !!