करनूर येथील महिलेची आत्महत्या

कागल(विक्रांत कोरे) : रामकृष्णनगर करनूर ता. कागल येथील सौ. शुभांगी भाऊसो नलवडे वय वर्ष 42 यांनी राहत्या घरी नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सकाळी ८.३० च्या सुमारास घडली. आत्महत्येचे कारण अद्याप समजले नाही. या घटनेची नोंद कागल पोलिसात झाली असून, अधिक तपास महिला पोलीस नाईक पाटील मॅडम करीत आहेत. त्यांच्या पश्चात सासू, … Read more

आदमापुरच्या विविध प्रलंबित विकास कामांसाठी माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांना निवेदन

मडिलगे(जोतीराम पोवार) : आदमापूर तालुका भुदरगड येथील विविध प्रलंबित विकास कामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध व्हावा यासाठी काँग्रेसचे राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक व बाजार समितीचे माजी संचालक सचिन घोरपडे व लोकनियुक्त सरपंच विजय गुरव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांना नुकतेच निवेदन देण्यात आले. यात श्री क्षेत्र आदमापूर येथे बाळूमामाच्या दर्शना करता महाराष्ट्र, … Read more

राष्ट्रवादी एकसंध होणारच शिवाय आमचे नेते शरद पवार साहेबच राहतील – मंत्री मुश्रीफ

मुरगूड ( शशी दरेकर ) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचे एक कुटुंब आहे. कदाचित काही थोडेसे मतभेद निर्माण झाले असतील पण अंबाबाईची शपथ घेऊन सांगतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कुटुंब एकसंध झाल्याशिवाय राहणार नाही . आणि शरद पवार साहेबच नेते आहेत अन राहतील असा विश्वास वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला … Read more

कुमार व कन्या प्राथमिक शाळांना सिद्धनेर्ली ग्रामपंचायतीकडून फर्निचर व क्रीडा साहित्य सुपूर्त

सिद्धनेर्ली : सिद्धनेर्ली प्राथमिक शाळेचे यश कौतुकास्पद असून भविष्यात जिल्ह्यात आदर्श व अग्रेसर अशी ही शाळा बनवू असा आशावाद सरपंच श्री दत्तात्रय पाटील यांनी व्यक्त केला. कागल तालुक्यातील सिद्धनेर्ली येथील कुमार व कन्या प्राथमिक शाळांना ग्रामपंचायतीकडून फर्निचर व क्रीडा साहित्य शाळार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शाळेमधील विविध स्पर्धा परीक्षेत यश मिळालेल्या विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक … Read more

कागल एमआयडीसीत दोन कंपन्यांवर जीएसटीचे छापे

कागल : माल एकाचा आणि बिल दुसऱ्याचे अशी बोगस बिले सादर केल्याच्या संशयावरून बुधवारी आणि गुरुवारी दोन दिवस कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील दोन प्रतिष्ठित कंपन्यांवर कोल्हापूर येथील जीएसटीच्या पथकाकडून छापे टाकले. या मोठ्या कंपन्यांची चौकशी अद्याप सुरू आहे. बनावट व्यापाऱ्यांकडून बनावट बिले सादर करून काही व्यवहार झाले आहेत का या दोन मुद्यांवर कोल्हापूर येथील जीएसटी … Read more

राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा

कागल : दरवर्षीप्रमाणे राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन व राजमाता जिजाऊ महिला समितीच्या वतीने जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात आदर्शवत काम करणाऱ्या शिक्षकांना “राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या 75 व्या अमृतमहोत्सवी जयंतीतिनी या आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांची घोषणा राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ. नवोदिता घाटगे यांनी केली. … Read more

सुळकुड पाणी योजना तात्पुरती स्थगित

इचलकरंजीकरांनी कागलचे पाणी नेण्यासाठी येण्याचे धाडस करू नये – मंत्री हसन मुश्रीफ कोल्हापूर : इचलकरंजीच्या सुळकुड नळ पाणी योजनेला कागल मधील आमदार, खासदार, मंत्र्यांसह सर्व नेत्यांनी एकमुखाने विरोध दर्शवला आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर बोलताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी इचलकरंजीकरांनी कागलचे पाणी नेण्यासाठी येण्याचे धाडस करू नये अशा शब्दात पाणी मिळणार नाही. … Read more

लोकसहभागातून ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियान यशस्वीपणे राबवा – जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर : आझादी का अमृत महोत्सव समारोपीय उपक्रमांतर्गत राज्यासह देशभरात ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियान राबवण्यात येणार आहे. दिनांक 9 ते 14 ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणाऱ्या या अभियानांतर्गत शिलाफलक, पंच प्रण शपथ, वसुधा वंदन, स्वातंत्र्य सैनिक, वीरांना वंदन या कार्यक्रमांसह तिरंगा फडकविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांना सहभागी करुन घेत लोकसहभागातून हे अभियान यशस्वीपणे राबवावे, … Read more

अखंडपणे प्रकाश मिळण्यासाठी वीजपुरवठा अखंडीत ठेवण्यात कर्मचाऱ्यांचे योगदान – डॉ. श्रीकृष्ण देशमुख

मुरगूड ( शशी दरेकर ) – वीजे शिवाय प्रकाश व उष्णतेची ऊर्जा मिळत नाही. त्यासाठी वीज कर्मचारी जीव धोक्यात घालून वीज पुरवठा अखंडीत ठेवतात त्यांच्या योगदानाची व वीजेची किंमत वीज खंडीत झाल्यावर समजते. असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय प्रवचनकार हभप डॉ़. श्रीकृष्ण देशमुख यांनी येथील कृतज्ञता कार्यक्रमात केले. तांत्रीक बिघाडामूळे खंडीत वीज पुरवठा झाल्यावर महापूर काळात जीव … Read more

error: Content is protected !!