जिल्ह्यातील अधिकाधिक मंडळांनी गणेशोत्सव स्पर्धेत 5 सप्टेंबरपर्यंत सहभाग नोंदवावा – पालकमंत्री दीपक केसरकर

कोल्हापूर, दि. 30 : पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्यात येणार आहे. पुरस्कारासाठी जिल्ह्यातील धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलीसाकडून परवानगी घेतलेल्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येणार आहे. जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या … Read more

मुरगूड व्यापारी पेठेतील ”गणेश तरुण मंडळच्या” अध्यक्षपदी मयूर आंगज तर उपाध्यक्ष पदी मयुर बोरगावे

मुरगूड ( शशी दरेकर ) : येथील बाजार पेठेतील सुवर्ण महोत्सवी श्री गणेश तरुण मंडळाची २०२३-२४ सालासाठीच्या कार्यकारिणी मंडळाची नियुक्ती नुकतीच पार पडली. कार्यकारीनी निवडीच्या बैठकीत मयूर आंगज यांची सर्वांनुमते अध्यक्षपदी तर मयूर बोरगावे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली तर श्रेणिक भैरशेठ याची खजिनदारपदी आणि सतीश माळवदे यांची सचिवपदी निवड करण्यात आली. श्री गणेश मंडळ … Read more

वृक्षमित्र प्रविण सूर्यवंशी यांचा वृक्षरक्षाबंधनाचा उपक्रम समाज पर्यावरण जागृती करणारा आहे – मुख्याधिकारी संदीप घार्गे

मुरगूड मध्ये २२५ वृक्षांना बांधल्या राख्या मुरगूड (शशी दरेकर) – वृक्षांप्रती बंधुभाव जोपासत वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी यांनी मुरगूडमध्ये गेल्या २० वर्षापासून चालू ठेवलेला वृक्षरक्षाबंधनाचा उपक्रम समाजात पर्यावरण जागृती करणारा असा आहे असे प्रतिपादन मुरगूड नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारीसो संदीप घार्गे यांनी केले. ते मुरगूड शहर निसर्ग मित्र मंडळ व महिला निसर्ग मंडळ मुरगूड यांचे विद्यमाने … Read more

डॉल्बीला फाटा देत सामाजिक सलोखा राखण्याचे कार्य करा – पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार

कागल ( विक्रांत कोरे ) : डॉल्बी मुक्त गणेश जयंती साजरी करा, तसेच डॉल्बीला फाटा देत सामाजिक सलोखा राखण्याचे काम मंडळांनी करावे. शासनाच्या सामाजिक उपक्रमात मंडळांनी सहभाग घेऊन पारितोषिके मिळवावीत असे आवाहन कागल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी केले. करनूर ता. कागल येथील ग्रामपंचायत कार्यालयमध्ये गणेश चतुर्थी पूर्व बैठकीदरम्यान ते बोलत होते. लोहार … Read more

डॉल्बी मुक्त, शांततेत गणेशोत्सव साजरा करा – उपनिरीक्षक रविकांत गच्चे

कागल / प्रतिनिधी – शांततेत व डॉल्बी मुक्त गणेश उत्सव साजरा करा .असे आवाहन कागल पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रविकांत गच्चे यांनी केले आहे. गणेश उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे. गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्व नागरिकांचा आनंदाचा उत्सव आहे .संपूर्ण महाराष्ट्रभर गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो .पण गेल्या काही दिवसात गणेश उत्सव मध्ये अनेक … Read more

पीक स्पर्धेसाठी 31 ऑगस्ट पूर्वी अर्ज सादर करण्याचे आवाहन

प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर स्पर्धेचे आयोजन कोल्हापूर, दि. 29 : राज्यात कृषी विभागामार्फत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतील खरीप हंगाम 2023 साठी जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी खरीप पिकांसाठी 31ऑगस्ट पुर्वी अर्ज सादर करुन पीक स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे. राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये … Read more

कागल पोलीसांकडुन 1 इंजिन व 2 मोटरसायकली जप्त

चोरीचा छडा लावण्यात यश कागल / प्रतिनिधी : काही दिवसापूर्वी पाण्याचे इंजिन व दोन मोटरसायकली चोरीस गेले होते. या चोरीचा छडा लावण्यामध्ये कागल पोलिसांना यश आले आहे. संग्राम शिवराम पाटील वय 32 राहणार पिराचीवाडी. तालुका कागल हे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्याकडून दोन मोटरसायकली व एक विहीरी वरील पाण्याचे इंजिन जप्त करण्यात आले. कागल … Read more

अनावधानाने गेलेला रक्तपातासारखा शब्द टाळता आला असता तर बरे झाले असते – मंत्री हसन मुश्रीफ

इचलकरंजीला दूधगंगेतून पाणी मिळणे केवळ अशक्य इचलकरंजी समन्वय समितीनेही कृष्णेतून पाण्यासाठीच प्रयत्न करावेत अशी त्यांना कळकळीची विनंती कोल्हापूर, दि. २८ : कोल्हापुरात दोन दिवसापूर्वीच दूधगंगा काठावरील संतप्त शेतकऱ्यांची बैठक झाली. त्यावेळी दूधगंगेतून पाण्यासंदर्भात अनावधानाने माझ्याकडून गेलेला रक्तपातासारखा शब्द टाळता आला असता तर बरे झाले असते, असे स्पष्टीकरण वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ … Read more

वाचा गहिनीनाथ समाचार ऑनलाईन

E paper

गहिनीनाथ समाचार अंक 57 गहिनीनाथ समाचार गेली २४ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २० वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या प्रतिक्रिया देत असतात. … Read more

गोकुळ कडून कागल तालुका संपर्क सभा

म्हैस दूध वाढीसाठी प्रयत्न – नविद मुश्रीफ कागल : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लि.कोल्हापूर (गोकुळ) यांचे वतीने कागल तालुका संपर्क सभा श्री. आर. के. मंगल कार्यालय, बामणी तालुका कागल येथे आयोजित केली होती. या कार्यक्रमासाठी गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष श्री. अरुणकुमार डोंगळेसो, माझे अध्यक्ष श्री. विश्वासराव पाटील (आबाजी) तसेच कागल तालुक्याचे संचालक श्री. … Read more

error: Content is protected !!