खेळ बातमी

जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्राच्यावतीने उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

कोल्हापूर, दि. 22 : जिल्हा क्रीडा अधिकारी, कार्यालय अंतर्गत जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्राच्यावतीने उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे दि. 10 ते 20 मे दरम्यान दोन सत्रात आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरामध्ये जास्तीत-जास्त मुला-मुलींनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांनी केले आहे.

शिबीरामध्ये कुस्ती, योगासन, बुध्दीबळ, टेबल टेनिस, जलतरण, फुटबॉल, हॉकी, नेमबाजी शिवाजी स्टेडीयम, कोल्हापूर येथे व नेमबाजी सकाळी 6.30 ते 9 वाजेपर्यंत व सायं. 4 ते 6 वाजेपर्यंत या खेळाचे क्रीडा प्रशिक्षण शिबीर होणार आहे. खेळाडूंना अनुभवी व राष्ट्रीय दर्जाचे क्रीडा मार्गदर्शन व प्रशिक्षक यांच्याकडून केले जाणार आहे. शिबीराकरिता वरील प्रत्येक खेळातील 8 ते 14 वयोगटातील प्रथम नाव नोंदणी करणाऱ्या 25 मुले व 25 मुली अशा एकूण 50 प्रशिक्षणार्थींना प्रवेश देण्यात येईल. सहभागी प्रशिणार्थीं खेळाडूंना क्रीडा गणवेश, (टी शर्ट, शॉटस) अल्पोपहार व प्रमाणपत्र देण्यात येईल.

अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, छत्रपती शिवाजी स्टेडीयम, कोल्हापूर येथील राज्य क्रीडा मार्गर्शक उदय पवार-9890770649, प्रवीण कोढंवळे-9823792879 व रविभूषण कुमठेकर-9403570358 यांच्याशी संपर्क साधावा, असेही श्री. साखरे यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *