मौखिक आरोग्य दिन(Oral Health Day) – ५ फेब्रुवारी

Bygahininath samachar

Feb 5, 2023 ##तारालावल्यावरदातांनात्रासहोतोका, ##दातकाढल्यानंतरजास्तत्रासहोतो, ##दुखणारादातकाढल्यानंतरत्रासवाढला, ##फिक्सदात, #bachelor of oral health, #dental health, #dental health care, #dental health tips, #gnm और anm क्या है और इस कोर्स को कैसे किया जाता है, #health, #health literacy, #healthy, #healthy mouth, #healthy teeth, #heart health, #oral health, #oral health and your heart, #oral health awareness, #oral health awareness - baby, #oral health experts, #oral health foundation, #oral health routine, #oral health therapist, #oral health tips, #world health days, #world oral health day, #world oral health day 2017, #world oral health day 2021 theme, #आरोग्य, #आरोग्य तांत्रिक प्रश्न, #आरोग्य दिन, #आरोग्य भरती 2021, #आरोग्य सेवक, #आरोग्य सेवक भारती gk questions, #ग्रामसेवक, #घे भरारी : दातांची काळजी कशी घ्याल?, #जागतिक आरोग्य दिन, #जागतिक दिवस, #दिनविशेष स्पेशल, #दुखणारा दात काढल्यानंतर त्रास वाढला, #मौखिक आरोग्य, #मौखिक साधने, #राज्यसेवा

तोंड व दातांचे आरोग्य-

तोंडाचे आरोग्य हे एकूण आरोग्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे. दात, हिरडया, तोंड यांसाठी खास वैद्यकीय शाखा त्यामुळेच आहे. आपणही यातल्या काही प्राथमिक गोष्टी शिकून घेतल्या पाहिजेत. आजुबाजूच्या व्यक्तींकडे बारकाईने लक्ष दिल्यास दात-तोंडाच्या अनेक आजारांशी आपली सहज ओळख होईल खराब झालेले दात किडलेले दात, दातावरचे कीटण, सुजलेल्या हिरडया, हिरडयांची झिजून उघडी झालेली दातांची मुळे वगैरे अनेक विकार पाहायला मिळतात. मुलांना देखील दातांचे अनेक आजार असतात. मागच्या पिढीच्या लोकांमध्ये दात हिरड्यांचे आजार मोठया प्रमाणात होते. अनेकांचे साठीच्या आधीच दात पडलेले असायचे. आताच्या पिढीत दात जास्त वर्षे शाबूत राहतात. याचे मुख्य कारण दातांचा ब्रशमुळे दात साफ राहतात, कमी आजार होतात आणि दात जास्त टिकतात.

दाताचा डॉक्टर नसल्यास काही साधी दंतवैद्यकीय तंत्रे शिकून आपण बरेच काम करु शकतो. दातांची, हिरडयांची तपासणी, दातांची निगा कशी ठेवायची ते सर्वांना शिकवणे, किडलेल्या दातात सिमेंट भरणे, कीटण काढणे, खूप हलणारा दात काढणे, वृध्द माणसांना कवळी बसवून घ्यायला प्रवृत्त करणे ही कामे अगदी महत्त्वाची आहेत. आपल्यालाही ती नक्की करता येतील. फक्त त्यासाठी थोडे प्रशिक्षण पाहिजे. या प्रकरणात या कामांसाठी लागणारी माहिती आपण बघू या.

समाजामध्ये सर्वांसाठी तोंडाचे आणि दातांचे आरोग्य फारच महत्त्वाचे आहे. मौखिक आरोग्य तुम्हाला एका निरोगी जीवनाकडे नेईल. (संपूर्ण आरोग्यपूर्ण जीवनामध्ये तोंडाच्या (मौखिक) आरोग्याचा फार मोठा वाटा आहे). आपले दात जागेवर धरुन ठेवण्यासाठी हिरड्या (जिंजिव्हे) त्यांच्याच भोवती असतात. हिरड्या निरोगी ठेवण्यासाठी, मुखाचे आरोग्य राखणाऱ्या सवयींचा अवलंब करा. दररोज किमान दोनदा ब्रशने दात स्वच्छ घासा, दररोज एकदा तरी फ्लॉसिंग (दातांमधील फटी  साफ करणे) करा आणि दातांच्या डॉक्टरकडे नियमितपणे जाण्याचे वेळापत्रक राखा. आपल्या हिरड्या लाल आणि सुजलेल्या असतील आणि त्यामधून चटकन रक्त येत असेल तर त्यांना जंतुसंसर्ग झाला आहे असे समजा. यास जिंजिव्हायटिस असे म्हणतात. त्वरित उपचाराने तोंडाचे आरोग्य पुन:श्च मिळवा. उपचार न केल्यास, जिंजिव्हायटिस खूपच गंभीर होऊन पेरिओडोंटिटिस रोग होईल आणि दात पडू लागतील.

तोंडाच्या आरोग्यासाठी ब्रश करा. तोंडाच्या आरोग्याची सुरुवात स्वच्छ दातांनी होते. दररोज किमान दोनदा ब्रशने दात स्वच्छ घासा. घाई न करता हे कार्य व्यवस्थितपणे पूर्ण करण्यासाठी पूर्ण वेळ लावून ब्रश करा. योग्य टूथपेस्ट आणि टूथब्रश वापरा. फ्लोराइडयुक्त टूथपेस्ट आणि नरम केसांचा ब्रश वापरा.

ब्रश दातांसमोर कोनात धरा व कमी अंतरात पुढे-मागे घासा. दातांचे चर्वण पृष्ठभाग तसेच जीभ ही घासा. मात्र फार वेगाने व दाबाने घासू नका अन्यथा हिरड्यांना इजा होईल. दर तीन-चार महिन्यांनी नवीन टूथब्रश घ्या. ब्रशचे केस फिस्कारले गेले तर ह्या आधी देखील ब्रश बदला.

तोंडाच्या आरोग्यासाठी सर्वसाधारण सल्ले व सूचना-

नरम ब्रिसलचा ब्रश वापरा. प्रत्येक जेवणानंतर खळखळून चुळा भरा. अडकलेले अन्नकण काढण्यासाठी फ्लॉसिंग (दातांमधील फटी साफ करणे) करा. तोंड कोरडे पडू लागल्यास लाळेचे प्रमाण वाढवण्यासाठी बिनसाखरेचे च्युइंगम चघळा.

लाळेचा प्रवाह वाढवण्यासाठी शुगर फ्री च्युइंगम चघळा. स्नायूंना व्यायाम घडविण्यासाठी कडक व दाणेदार पदार्थ खा. मद्यार्कविरहित माउथवॉशचाच वापर करा कारण मद्यार्कयुक्त माउथवॉशने तोंड कोरडे पडते ( झेरोस्टोमिया – तोंड कोरडे पडणे).

जीभ स्वच्छ आहे ह्याची खात्री करण्यासाठी टंग क्लीनर वापरा. जिभेवर जीवाणूंचा थर जमल्यास हॅलिटोसिस सारखे रोग होऊ शकतात. टूथब्रशने देखील जीभ स्वच्छ करता येते. पडून गेलेल्या दातांच्या ठिकाणी खोटे दात बसवावे (इंप्लांट्स) म्हणजे क्राउन्स आणि ब्रिजना आधार मिळतो व चेहऱ्याची एकंदर ठेवण चांगली दिसते. दात झिजले असल्यास, तुम्ही विविध उपाय करुन त्याचे निवारण मिळवू शकता. क्राउन लावून ते मूळ आकारात आणता येतात तसेच इंप्लांटचे देखील विविध प्रकार असतात. धूम्रपानामुळे तोंडाचे आरोग्य बिघडते. त्याने दात तर काळे पडतातच शिवाय इतर अनेक गंभीर परिणाम होतात.

प्राचार्या, आरोग्य व कुटूंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, कोल्हापूर

One thought on “मौखिक आरोग्य दिन(Oral Health Day) – ५ फेब्रुवारी”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!