मुरगूड (शशी दरेकर) : सामाजिक चळवळीतील ज्येष्ठ नेते दलितमित्र एस आर बाईत यांच्या अमृत महोत्सवा निमित्त व त्यांच्या आजवरच्या सामाजिक कार्याच्या कृतज्ञतेपोटी सोनगे ता. कागल येथे २६ नोव्हेंबर रोजी प्रबोधन मेळावा चळवळीतील कार्यकर्त्यानी श्री बाईत यांच्या कार्यासंबधी कार्यकर्त्यांनी लिहिलेल्या लेखांच्या गौरव अंकाचे प्रकाशन आणि त्यांचा सत्कार ही होणार असल्याची माहीती गहिनीनाथ सहकार समूह व नवनिर्माण सामाजिक संस्था या संयोजन समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली.
या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून संत साहित्याचे युवा अभ्यासक सचिन पवार (पुणे) व कॉ. संपत देसाई हजर रहाणार आहेत तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान परिवर्तनवादी चळवळीतील ज्येष्ठ नेते डॉ. अच्युत माने (निपाणी) हे भूषवणार आहेत. या कार्यक्रमाला माजी आमदार बजरंग देसाई, हुतात्मा किसन अहिर साखर कारखान्याचे चेअरमन वैभव काका नायकवडी, पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ नेते मारुतराव जाधव गुरुजी, लालबावटा कामगार संघटनेचे जिल्हा सचिव कॉ. शिवाजीराव मगदूम तसेच कोल्हापूरचे माजी महापौर मारुतराव कातवरे, ज्येष्ठ पत्रकार सुभाष धुमे (गडहिग्लंज), कागलचे नगरसेवक चंद्रकांत गवळी निपाणी एकीकरण समितीचे अध्यक्ष जयराम मिरजकर , माऊली वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प .उद्धव जांभळे,’ टी एस गडकरी आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत तरी सामाजि , परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी या प्रबोधन मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे .