क्यू मॅनेजमेंट पोर्टल देणार मतदान केंद्रावर रांगेत उभे असलेल्या मतदारांची संख्या

कोल्हापूर (जिमाकाकोल्हापूर शहरातील मतदान केंद्रावर मतदानासाठी किती मतदार रांगेमध्ये उभे आहेत. हे आता आपल्याला एका क्लिकवर जाणून घेता येईल. कोल्हापूर शहरातील 274 – कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामधील 186 व 276- कोल्हापूर उत्तर मतदारसंघामधील 315 मतदान केंद्रे अशी एकूण 501 मतदान केंद्रावर रांगेत किती मतदार उभे आहेत, याची माहिती आता सहजपणे जाणून घेता येईल. यासाठी जिल्हा प्रशासनाने “क्यू मॅनेजमेंट पोर्टल” विकसीत केलेले आहे.

Advertisements

 या पोर्टलच्या लिंकद्वारे विधानसभा मतदारसंघाची निवड करावयाची आहे व त्यानंतर मतदान केंद्राची निवड करावयाची आहे. त्यानंतर “पहा” वर क्लिक केल्यानंतर संबंधित मतदान केंद्रावर मतदानासाठी रांगेत किती मतदार उभे आहेत याची संख्या मतदारांना पाहता येईल.

Advertisements

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदान दिनांक २० नोव्हेंबर रोजी होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी अधिकाधिक होण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी अमोल येडगे, महानगरपालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. व स्वीप टीम यांनी असे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविलेले आहेत. क्यू मॅनेजमेंट पोर्टलमुळे मतदानासाठी किती वेळ लागू शकतो याचा अंदाज कोल्हापूर शहरातील मतदारास येवू शकेल व  त्या दुष्टीने वेळेचे नियोजन त्यांना करता येईल. क्यू मॅनेजमेंट पोर्टलमुळे कोल्हापूर शहरातील मतदानाची टक्केवारी निश्चितच वाढेल असा विश्वास जिल्हा प्रशासनास आहे.

Advertisements

क्यू मॅनेजमेंट पोर्टलची लिंक पुढीलप्रमाणे आहे.  https://queue.evoterpledgekolhapur.com/

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!