कागल शहरामध्ये झाली बैठक
कागल : इचलकरंजी पाणी योजना हाणून पाडण्यासाठी गेल्या वर्षभरापासून कागल तालुक्यासह सीमाभागातील जनता हाटाला पेटली आहे. माञ, येथील नेतेमंडळींची भुमिका गुलदस्त्यातच होती. परंतु,जनरेटयामुळे येथील नेतेमंडळींनीही दुधगंगा बचाव कृती समितीच्या भुमिकेला साद दिली आहे. हा आपल्या एकजुटीचा पहिला विजयच आहे. नेतेमंडळींचे मिळालेले बळ आणि नागरिकांतून वाढत्या प्रतिसादाच्या जोरावर आता इचलकरंजी पाणी योजना हटाव ची मोहीम सहजपणे फत्ते करु असा विश्वास सागर कोंडेकर यांनी व्यक्त केला. गांधी नगर थेट पाईपलाईन विरोध असल्याचे निवेदन तहसीलदार यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला.
कागल येथे आयोजित दुधगंगा बचाव कृती समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी धनराज घाटगे, महेश घाटगे,संदिप नेर्ले, सागर शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अंबरीशसिह घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच, राजेंद्र बागल, संजय गोनुगडे,सतीश पाटील, इंद्रजित घाटगे, संजय चितारी,सचिन घोरपडे,राजेंद्र साळुंखे, रंजित पाटील, विक्रम चव्हाण यांच्या सह शहरवाशी उपस्थित होते.
कालवे आणि वेदगंगा काठावरील नागरिकांनी साथ द्यावी..
काळम्मावाडी धरणातील पाण्याच्या टंचाईचा पहिल्यांदा फटका हा वेदगंगा नदीकाठावरील आदमापुरच्या पुर्वेकडील आणि दोन्हीकडील कालव्यांना बसतो. त्यामुळे भविष्यात पाणी बाणी निर्माण होवू नये यासाठी इचलकरंजी,गांधीनगर पाणी योजनेला प्रखर विरोध करण्यासाठी वेदगंगा आणि कालव्याच्या पाण्याचा लाभ होणार्या शेतकऱ्यांनी सज्ज व्हावे असे आवाहनही कोंडेकर यांनी केले.