
श्री इंदिरा सहकारी दुध संस्था,रास्त भाव धान्य दुकान यांच्या मार्फत आनंदाचा सिधा वाटप करताना
सिद्धनेर्ली : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त पिंपळगाव खुर्द ता कागल येथील अशोकराव नवाळे समुहाच्या श्री इंदिरा सहकारी दुध संस्था,रास्त भाव धान्य दुकान यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्य शासनाने जाहिर केलेल्या आदेशानुसार गुढी पाडवा आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती निमित्त आनंदाचा शिधा वाटप नवाळे समुहाचे संस्थापक व तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक अशोकराव नवाळे, इंदिरा दुध संस्थेचे चेअरमन अशोक वठारे, माजी चेअरमन आनंदा जाधव, ग्रामपंचायत सद्स्य मा श्री जे डी कांबळे यांच्य प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी संस्था सचिव रमेश वाईंगडे, विठ्ठल परीट,हैबत्ती जाधव, गणेश घाटगेट, नेताजी टिपुगडे,आदि मान्यवरांच्या उपस्थित होते.यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.