मडिलगे (जोतीराम पोवार) : महाराष्ट्र, व कर्नाटक राज्यातील असंख्य भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या वाघापूर तालुका भुदरगड येथील ज्योतिर्लिंगाची नागपंचमी हा उत्सव सोमवार दिनांक 21 रोजी होत आहे महाराष्ट्र व कर्नाटकातून असंख्य भाविक दर्शनासाठी येत असतात.
यावर्षी श्रावण महिन्यातील पहिल्याच सोमवारी ही यात्रा येत असल्याने भाविकांना दर्शनाची पर्वणी लाभणार आहे पहाटे चार वाजता श्री व सौ आमदार प्रकाश आंबिटकर यांच्या शुभहस्ते महापूजा झाल्यानंतर काकड आरती होईल या महाआरती दरम्यान येणाऱ्या प्रथम भाविकाला.
आमदार आबिटकर यांच्या सोबत महापूजेचा सन्मान दिला जाईल यानंतर या भाविकाचा स्थानिक देवस्थान समितीच्या वतीने सत्कार करण्यात येईल यानंतर मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुले केले जाईल गेले. आठ दिवस मंदिर परिसरात व गावातील स्वच्छता पूर्ण झाली असून स्ट्रीट लाईट तसेच येणाऱ्या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची मुबलक सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
भाविकांसाठी गारगोटी, कागल, राधानगर, कोल्हापूर आदी आगारातून जादा एसटी बस उपलब्ध करण्यात आल्या आहेत यावेळी कूर – वाघापूर..ते मुरगुड व मुरगुड – आदमापूर – मुधाळतिट्टा – कूर ते वाघापूर अशा एकेरी मार्गाचा अवलंब करण्यात आला असल्याचे आवाहन स्थानिक देवस्थान समितीचे अध्यक्ष व सरपंच बापूसो आरडे यांनी केले आहे