अविनाशदादा पाटील यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन
मुरगूड ( शशी दरेकर ) : युगप्रवर्तक हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची 350 वी जयंती हुतात्मा तुकाराम वाचनाच्या वतीने मोठ्या -उत्साहात साजरी झाली. अविनाशदादा पाटील यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. गहिनीनाथ समाचार चे प्रतिनिधी शशिकांत दरेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
शिवजयंती विविध उपक्रमाने साजरी करण्यात येते. यावर्षीच्या शिवजयंती उत्सवात साजरी करण्यात आली. माजी उपनगराध्यक्ष जयसिंगराव भोसले, समाजवादी प्रबोधिनीचे माजी अध्यक्ष बी. एस. खामकर ,युवा नेते सत्यजित पाटील, वाचनालयाचे सचिव शिवाजीराव चौगले, वाचनालयाचे संचालक व माजी नगरसेवक किरण गवाणकर, एडवोकेट खाशाबा भोसले, अविनाश चौगले, पी आर चव्हाण, रामचंद्र कांबळे, आर के पवार, सुरेश रामाने, ग्रंथपाल संदीप वरपे, सहा.ग्रंथपाल सौ.रेखा भारमल, सौ. शुभांगी कलकुटकी, उत्तम बरकाळे व अन्य मान्यवर उपस्थित होते.