मुरगूड ( शशी दरेकर ): मुरगूड नगरपरीषदेच्या वतीने पसायदान व संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरांची सप्त शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी ७५० वी जयंती मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. हा कार्यक्रम राज्य शासनाच्या निदर्शना नुसार नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अतिश वाळुंज यांच्या मार्गदर्शनाखाली झाला.
नगरपरिषद कार्यालय , तसेच शहरातील विविध शाळा महाविद्यालयामध्ये पसायदानाचे आयोजन करुन प्राध्यापक शिक्षक शिक्षकेत्तर सेवकवृंद यांच्याकरवी पसायदान म्हणण्यात आले.

तसेच १५ ऑगस्ट सायंकाळी ४वाजता संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीची शहरातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. नगरपरिषद कार्यालयातून निघालेली ही मिरवणूक शहराशी सलग्न उपनगरे व शहराच्या विविध मार्गांवरून मिरवणूक काढण्यात आली.
कर्न मधूर अभंग व सुश्राव्य कीर्तनामुळे मिरवणुकीचा मार्ग भक्तिमय झाला. यावेळी पालिकेचे अधिकारी कर्मचारी व नागरिक पारंपरिक वेशभूषेत टाळ,मृदुंग,विणा, चिपळ्या, घेऊन भजन व कीर्तनात दंग झालेले पहायला मिळाले.
शहरातील विविध मार्गांवरून पालखीची मिरवणूक काढून नगरपालिकेत आगमन झाल्यावर माऊलींची विधीवत पूजा व अभिषेकचा कार्यक्रम झाला. यावेळी मुख्याधिकारी अतिश वाळुंज यांच्या सह अधिकारी ,कर्मचारी , मोठ्या संख्खेने शहरवासीय भावीक उपस्थित राहिल्याने कार्यक्रम खूपच रंगतदार झाला.