मुरगूड नागरी सह. पतसंस्थेचा मुरगूडमध्ये शानदार उदघाटन सोहळा संपन्न

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथे सरपिराजी रोड, बँक ऑफ इंडीया शेजारील इमारतीमध्ये ” मुरगूड नागरी ” सहकारी पतसंस्थेचा शानदार उदघाटन सोहळा संपन्न झाला. आंतरराष्ट्रीय प्रवचनकार ह . भ .प. डॉ . श्रीकृष्ण देशमुख ( काका ) यांच्या शुभहस्ते फित कापून हा उदघाटन सोहळा पार पडला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. समिर आयुब आगा( ए.आर. ऑफिस, पन्हाळा हे होते.

Advertisements

यावेळी मा. जोतिराम सुर्यवंशी- पाटील, मा. श्रीकांत निकम , मा . समिर मुल्ला यांच्या शुभहस्ते ठेव पावतींचे वितरण करण्यात आले. या पतसंस्थेच्या उदघाटनाच्या पहिल्याच दिवशी १ कोटी ठेवीचे भरघोस असे संकलन झाले. या संस्थेच्या उदघाटन प्रसंगी मा. नामदार हसनसो मुश्रीफ साहेब, मा. राजे समरजितसिंह घाटगे, मा. प्रविणसिंह पाटील यानीं सदिच्छा भेट दिली.

Advertisements

यावेळी संस्थेचे आधारस्तंभ मा. हाजी धोंडीबा मकानदार , संस्थापक चेअरमन मा. जावेद मकानदार, श्री. लक्ष्मीनारायण सह. पतसंस्थेचे चेअरमन किशोर पोतदार, श्री. व्यापारी नागरी सह. पतसंस्थेचे चेअरमन किरण गवाणकर, प्रशांत शहा, प्रविण दाभोळे, नामदेव गोरूले, सुहास खराडे, पांडूरंग कुडवे, नंदकुमार बेळेकर, या मान्यवरांच्यासह सर्व संचालक मंडळ, कर्मचारी वर्ग, सभासद, हितचिंतक उपस्थित होते.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!