बाळकृष्ण सणगर यांचे चित्रांचे प्रदर्शन

कागल : कागल येथील हौशी चित्रकार श्री बाळकृष्ण ज्ञानदेव सणगर ( सध्या रा.  नेहरु नगर,कोल्हापूर) यांच्या ऑइल कलर मधील चित्रांचे प्रदर्शन सोमवार दिनांक 4 नोव्हेंबर 2024 ते बुधवार दिनांक 6 नोव्हेंबर 2024 या कालावधीत कोल्हापुरातील राजर्षी  शाहू स्मारक भवन येथे भरविण्यात येणार आहे. वयाच्या 85 व्या वर्षीही बाळकृष्ण सणगर  हे विविध प्रकारची चित्रे रेखाटत आहेत.

Advertisements

          ज्येष्ठ चित्रकार विलास बकरे यांच्या हस्ते  सोमवारी सकाळी दहा वाजता या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून प्राचार्य अजेय दळवी,  विजय टिपुगडे,  प्रसादकुमार सुतार  प्रमुख उपस्थित राहणार आहेत .  धार्मिक वृत्तीचे असणारे बाळकृष्ण सणगर यांनी विविध महापुरुष आणि देव देवतांच्या चित्रकृती आपल्या कुंचल्यातून साकारल्या आहेत .त्यासाठी चित्र साकार करण्यापूर्वी त्यांनी देव देवता व महापुरुषांचा सखोल अभ्यास केला आहे.या चित्रप्रदर्शनचा लाभ घ्यावा. असे आवाहन सणगर परिवारातर्फे करण्यात आले आहे.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!