मुरगूड ( शशी दरेकर ):
Advertisements
कृत्रिम तलावात गणपती व निर्माल्य विसर्जन करूया, प्रदुशन टाळूया. असे आवाहन मुरगूड नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी अतिश वाळुंज व सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने मुरगूड शहरवासीयांना प्रसिद्धी पत्रकाव्दारे केले आहे.
Advertisements

कुरणी बंधारा, हुतात्मा तुकाराम चौक, सुलोचनादेवी वि. पाटील गावतलाव, दत्तमंदिर वाघापूर रोड, सरपिराजीराव तलाव या पाच ठिकाणी नगरपंचायतीने भक्तांसाठी कृत्रिम तलाव व निर्माल्य कलशाची व्यवस्था केली आहे.
आपल्या बाप्पाचे विसर्जन कृत्रिम तलावात करून इको बाप्पा उपक्रमाव्दारे पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी हातभार लावूया असे आवाहन मुरगूड नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
AD1