बेळगांव येथे दिमाखदार सोहळ्यात संस्थेला केले सन्मानित
मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड ता . कागल येथिल अल्पावधीत सर्वांच्या जिव्हाळ्याची बनलेली श्री . गणेश नागरी सह .पतसंस्थेला बेळगांव येथिल “नॅशनल रुलर डेव्हलेपमेंट फौडेशन ” तर्फे दिला जाणारा महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा राज्याचा ” आंतराज्य पुरस्कार ” दि .०८ / १० / २०२२ रोजी बेळगांव येथे दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. पुरस्कार सोहळ्यास गोव्याचे माजी मुख्यमंत्री श्री. लक्ष्मीकांत पार्सेकर, कर्नाटकच्या माजी केंद्रीय मंत्री श्रीमती रत्नमाला सावनुर, बेळगांवचे खासदार श्री. अमरसिंह पाटील, बेळगांवचे माजी आमदार श्री. संजय पाटील, आमदार निलेश लंके, कोल्हापूरचे माजी महापौर राजू शिंगाडे व इतर मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत हा दिमाखदार सोहळा पार पडला.
सहकार क्षेत्रातील उत्तुंग भरारी मुळे व संस्थेने केलेल्या गुणात्मक कार्याची दखल घेऊन सदर पुरस्कार संस्थेला बहाल करण्यात आला . संस्थेने सामाजिक कार्यातही समाजामध्ये आपला एक वेगळा ठसा उमठविला आहे .आतापर्यंत केलेल्या उत्कृष्ठ कामांची ही एक पोहोच पावतीच म्हणावी लागेल.
सहकार, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य व बांधकाम क्षेत्रातील, लोकानां पुरस्कार देऊन गौरवण्यात आले .सन्मानचिन्ह , अभिनंदन पत्र, म्हैसूर फेटा व चंदनाचा हार देऊन या दिमाखदार सोहळ्यात संस्थेचा गौरव करण्यात आला.
सदर पुरस्कार स्विकारतानां श्री. गणेश नागरी सह. पतसंस्थेचे चेअरमन श्री. उदयकुमार शहा, व्हा. चेअरमन श्री. प्रकाश हावळ , श्री. एकनाथ पोतदार, श्री. आनंदराव देवळे, श्री. मारूती पाटील, श्री. सुखदेव येरुडकर, श्री. सोमनाथ यरनाळकर, श्री. राजाराम कुडवे, श्री. आनंदा जालिमसर, श्री . दत्तात्रय कांबळे , सौ . रुपाली शहा , सौ . रेखा भोसले, कार्यलक्षी संचालक श्री. राहुल शिंदे व वसुली अधिकारी श्री. दयानंद खतकर उपस्थित होते.
संस्थेस आंतरराज्य पुरस्कार मिळाल्याने मुरगूड प्रंचक्रोशीतील मान्यवरांच्याकडून व सभासदांच्याकडून संस्थेवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे .
Your posts always provide me with a new perspective and encourage me to look at things differently Thank you for broadening my horizons