मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड जवळील करंजिवणे गावची खोखो खेळाडू कु. वैष्णवी बजरंग पोवार हीची विश्विविजेत्या भारतीय महिला खो खो संघात निवड झाली होती.या खेळातील तिचे नैपुण्य तिने तेथे सिध्द करून तर दाखवले आहेच शिवाय आपल्या गावाचे व जिल्ह्याचे नावही तिने झळकावले आहे.
तिच्या भव्य नागरी सत्कारासाठी मुरगूड नगरी सज्ज झाली आहे.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या सत्कारा मुळे ग्रामीण भागातील मुलामुलींना प्रोत्साहन मिळते.त्यातून नवीन उत्तमोत्तम खेळाडू तयार होतील असे मत संयोजक मंडळांकडून व्यक्त करण्यात आले.
सोमवार दिनांक २७ जानेवारी रोजी ४वाजता मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे व शिवतीर्थावर वैष्णवीचा भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे.