मुरगूड ( शशी दरेकर ) : लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांच्या ९१ व्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये शहाजी लॉ महाविद्यालय कोल्हापूर ची विद्यार्थिनी कु. वैष्णवी रवींद्र पोतदार हीने प्रथम क्रमांक पटकावून ती सदाशिवराव मंडलिक चषकाची मानकरी ठरली.
रूपये ५०००/-रोख चषक व प्रमाणपत्र असे बक्षिसाचे स्वरूप होते. या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे –
द्वितीय क्रमांक -रु.३००१/- चषक व प्रमाणत्र विजेती कु. अमृता पांडुरंग सागर(डी. के. शिंदे महाविद्यालय गडहिंग्लज), तृतीय क्रमांक – रु.२००१/- चषक व प्रमाणत्र विजेता कु. चारुदत्त महादेव माळी(शिवराज महाविद्यालय गडहिंग्लज)

या स्पर्धेतील विजेत्यांना दिलेल्या बक्षिसांचे प्रथम क्रमांकाचे प्रायोजक – महात्मा फुले दूध संस्था चिमगाव- चषक जय शिवराय एज्यु.सोसा. सर्व्हट्स को.ऑ.के. सोसा., मुरगूड, द्वितीय क्रमांकाचे प्रायोजक : राजर्षि शाहू नागरी सहकारी पत संस्था मर्या; मुरगूड, तृतीय क्रमाकाचे प्रायोजक : जय शिवराय सह. दूध संस्था मर्या, मुरगूड आहेत .
तर उत्तेजनार्थ १,०००/-रूपये चषक आणि प्रमाणपत्र अशी एकूण सहा पारितोषिके होती. त्याचे विजेते पुढीलप्रमाणे – १)कु.भगवंत रामचंद्र कोळी (सांगोला महाविद्यालय सांगोला), २)कु.वेदिका उत्तम पाटील (पार्वतीबाई मोरे महाविद्यालय सरवडे), ३)कु.श्रुती राजू कुरणे (न्यू कॉलेज कोल्हापूर) ४)कु.समीक्षा आनंदा पाटील (एस. जी. एम. कॉलेज कराड) ५)कु.धनश्री प्रवीण पोवार (देवचंद महाविद्यालय अर्जुननगर) ६)कु.श्रद्धा शहाजी मेटिल (भारती विद्यापीठ इंजिनियर कॉलेज कोल्हापूर)
पारितोषिक वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे जय शिवराय एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह मा. अण्णासाहेब थोरवत होते. स्पर्धेतील विजेत्यांना मा. अण्णासाहेब थोरवत आणि प्राचार्य प्रा.डॉ. शिवाजी होडगे यांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली. पारितोषिक वितरण समारंभाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. शिवाजी होडगे होते. कार्यक्रमासाठी महावीर कॉलेजचे प्राचार्य प्रा.डॉ..ए.डी.जोशी तसेच, प्रा. पांडुरंग सारंग, प्रा. टी.एच. सातपुते मा.अनिल राऊत, या. संदीप मुसळे उपस्थित होते.
या स्पर्धेची परीक्षण प्रा.डॉ. मांतेश हीरेमठ, प्रा.डॉ.बळवंत मगदूम, प्रा. सुभाष चोपडे यांनी केले. टाईम किपर म्हणून प्रा. दिगंबर गोरे, प्रा. सुशांत पाटील यांनी काम पाहिले. या स्पर्धेचे संयोजन डॉ. सुखदेव एकल, प्रा. नितेश रायकर आणि संयोजन समितीचे सदस्यांनी केले. या समारंभाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. नितेश रायकर यांनी केले तर आभार प्रा.दादासाहेब सरदेसाई यांनी मानले.या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.