सौ.दिपाली भरत कतगर स्व .राजे विक्रमसिंह घाटगे “आदर्श शिक्षिका पुरस्काराने” सन्मानित

कागल प्रतिनिधी:स्वर्गीय राजे विक्रमसिंहजी घाटगे “आदर्श शिक्षिका पुरस्कारने”नेर्ली (ता.करवीर) विद्यामंदिरच्या अध्यापिका सौ. दिपाली भरत कतगर सुळकूड (ता.कागल) यांना सन्मानित करण्यात आले. सौ. दिपाली कतगर यांनी केलेल्या शैक्षणिक कार्याची दखल घेवून त्यानां प्रदान करणेत आला. राजमाता जिजाऊ महिला समितीच्या अध्यक्षा आईसाहेब शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते तसेच उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, गोकुळचे माजी चेअरमन रणजीतसिंह पाटील, बाबासाहेब पाटील, कागल बँकेचे अध्यक्ष एम. पी. पाटील आणि शाहू ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य बी. के. मडिवाळ, मनोहर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार मूरगूड येथे प्रदान करणेत आला. सौ.दिपाली कतगर यानां पुरस्कार मिळाल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!