गडहिंग्लज(प्रतिनिधी): गडहिंग्लज शहराचे भौगोलिक क्षेत्र पाहता शहरातील सीमेवर ओढ्यांचे अस्तित्व आहे. गतवर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील ओढ्यामधून पाणी नागरी वस्तीत घुसून लोकांचे अतोनात नुकसान झाले. त्या दरम्यान मंत्रिमंहोदय व शासकीय अधिकाऱ्यांनी पुरक्षेत्राची पाहणी करून उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले होते.
आज या घटनेला वर्षभर होत आले असून पुन्हा अवकाळी पाऊस तसेच नियमित पावसाळा सुरू होण्याची वेळ झाली तरी अद्यापही सदर रोड वरील ओढ्यामधून पाणी नागरी वस्तीत जाऊ नये याबद्दलची कोणतीच ठोस उपाय योजना झाल्याचे दिसत नाही. गतवर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील लाखेनगर तसेच आजरा रोडवरील असणाऱ्या अर्बन कॉलनी व कोड्ड कॉलनी येथील नागरिकांना पूर परिस्थितीत गंभीर परिणामांना सामोरे जावे लागले. याचबरोबर तेथील नागरिकांच्या अरोग्याविषयी अनेक समस्या निर्माण झाल्या.
पुन्हा पावसाळ्याचे दिवस जवळ येऊ लागल्यामुळे स्वामी कॉलनी अर्बन कॉलनी तसेच कोड्ड कॉलनी येथील नागरिकांच्या मनात भीतीचे साम्राज्य पसरले आहे. तरी शासनाने तात्काळ सदर ओढ्यामधील गाळ काढून ओढयांचे ( खोली करण ) करावे तसेच आजूबाजूच्या परिसरात व नागरीवस्थित पाणी जाऊ नये याबद्दल योग्य त्या सर्व उपाययोजना करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी आम्ही केली असून त्याची पूर्तता अजूनही झालेली दिसून येत नाही.
तसेच सध्या गडहिंग्लज शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून दरवर्षीप्रमाणे प्रत्येक वेळी निवेदन देऊन प्रशासनाला जागे करावे लागते काही घटना घडल्या शिवाय प्रशासक जाग होत नाही त्यामुळे कुत्र्याचा ही बंदोबस्तात तात्काळ करावा अन्यथा पुढील आंदोलन हे आक्रमक दिल्याप्रमाणे केले जाईल याला प्रशासन जबाबदार राहील असा इशारा नागेश चौगुले जिल्हाध्यक्ष मनसे अभिषेख दौलतरावं जाधव,संदीप कुरबेट्टी आदींनी दिला आहे.