अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या उपाध्यक्षपदी मिरासाहेब मगदूम


करवीर काशी फौंडेशनच्या वतीने सत्कार.


कोल्हापूर (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या उपाध्यक्षपदी सुसंस्कार शिक्षण संस्थेचे संस्थापक मिरासाहेब मगदूम यांची निवड करण्यात आली, याबद्दल करवीर काशी फौंडेशनचे मासिक बैठकीत सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक बाळासाहेब गवाणी-पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी साने गुरुजी सामाजिक संस्थेचे चंद्रसेन जाधव होते.

Advertisements


प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष सुनीलकुमार सरनाईक यांनी प्रास्ताविक केले.श्री. गवाणी पाटील, नंदकुमार डोईजड, चंद्रसेन जाधव, यांनी श्री.मगदूम यांचा गौरव केला.यावेळी एल.आय.सी.चे.अधिकारी विजय शिंदे, कर्तृत्व सामाजिक संघटनेचे अध्यक्ष विराज सरनाईक,वृत्तपत्र विक्रेते सतिश दिवटे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब गंगधर, हर्षवर्धन शिंदे, आदी उपस्थित होते, शिवप्रेमी मिलिंद सावंत यांनी आभार मानले.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!