मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथे मित्र परिवारांची भेट घेण्यासाठी मा . श्री . रवि सरदेसाई ( मुंबई सहाय्यक पोलिस आयुक्त )यानीं धावती भेट घेतली. श्री. रवि आनंदराव सरदेसाई याना मुंबई सहाय्यक पोलिस आयुक्त पदी बढती मिळाल्याबद्दल मुरगूडच्या श्री. व्यापारी नागरी सह .पतसंस्थेचे चेअरमन श्री. किरण गवाणकर, संचालक श्री. शशी दरेकर, संदिप कांबळे यानी पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन येथोचित सत्कार करण्यात आला.
बाचणी ता. कागल येथिल शिस्तप्रिय -संस्कारी, आणि निष्ठावंत असे आदर्श शिक्षक श्री .आनंदराव ईश्वरा कांबळे ( गुरुजी ) व कष्टाळू आणि मायाळू अशी माता सुनंदा आनंदराव कांबळे या दांपत्याच्या पोटी त्यांच्या जन्म झाला. तात्कालिन परिस्थीतीत मिळालेल्या शिक्षणाच्या मार्गाने आणि अपार कष्ट व जिद्दीच्या जोरावर आपण एम .पी. एस .सी.मार्फत पी .एस़ .आय. झालो. बाचणी गावाने मला अपार प्रेम दिले .पी.एस.आय .पदापासून ए .पी.आय. सिनिअर पी .आय., डी.वाय.एस.पी. ( अंटिकरप्शन ) या पदापासून आपण ए .पी.आय. सिनिअर पी .आय. ,डी . वाय .एस.पीं . ( अँटिकरप्शन ) या पदापर्यंत बढती मिळत गेली . आता तर ” मुंबई -सहाय्यक पोलिस आयुक्त पदी बढती मिळाली आहे . त्यामुळे छोटयाशा बाचणी गावचे नांव अभिमानाने उंचावले आहे .
मुरगूडमध्ये पाचवी ते दहावी -पर्यंतचे शिक्षण ” मुरगूड विद्यालयमध्ये झाल्याचे त्यानीं आपल्या भाषणात आवर्जून उल्लेख केला .. मुरगूड विद्यालयात शिक्षण घेतानां गुणवत्ता , स्वभाव , आपल्या कोणत्याही संकटाला धीराने आणि सकारात्मकतेने सामोरे जाण्याचा करारी बाणा मला मुरगूड विद्यालयाने दिल्याचे त्यानीं सत्काराला उत्तर देतानां सांगितले .
या कार्यक्रमावेळी प्रा , चंद्रकांत जाधव , दिपक माने , अनिल मगदूम , सनी गवाणकर , प्रकाश सणगर , प्रशांत हळदकर , विशाल भोपळे इत्यादी उपस्थित होते ,
शेवटी -स्वागत संदिप कांबळे यानी तर आभार अमोल मेटकर यानीं मानले ,