लोकनेते कै. खा. सदाशिवराव मंडलिक यांना मुरगूडमध्ये विनम्र अभिवादन

मुरगूड ( शशी दरेकर ) – स्वर्गीय लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांची ८९वी जयंती मुरगूडमध्ये शिवभक्त धोंडीराम परीट व नागरिकांच्या वतीने साजरी करण्यात आली. लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांच्या प्रतिमेचे पूजन सौ. भारती धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले . त्यानंतर सर्वांनी स्व. मंडलिक यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले.

Advertisements

या कार्यक्रमात शिवभक्त थोंडीराम परिट यांनी स्वागत केले. यावेळी बोलताना प्रा सुनिल डेळेकर म्हणाले , लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांनी आपल्या सार्वजनिक जीवनात गोरगरीबसामान्य जनता केंद्रबिंदू मानून कार्य केले . त्यांचे कार्य समाजाला आजही उपकारक आहे . त्यांचे विचार व कार्य पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

Advertisements

यावेळी भारती धर्माधिकारी , विकी साळोखे .सौं स्नेहल मोर्चे. यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास अरूंधती साळोखे ‘मंगल गोरुले, प्रियांका मिरजकर, शुभांगी गवाणकर, स्वरा शहा, गिता रणवरे, कासुबाई चित्रकार, अनुराधा गवाणकर, सदानंद मिरजकर, पत्रकार शशी दरेकर, नगरसेवक विशाल सुर्यवंशी, पांडुरंग सुर्यवंशी, विनय पोतदार, आनंदा गोरुले, अमित दरेकर, अमर कापशे, बसू मेस्त्री, आदि सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!