मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथिल शहर जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने लोकमान्य टिळक पुण्यतिथी व आण्णाभाऊ साठे जयंती जेष्ठ नागरिक संघाच्या विरंगुळा केंद्रात उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. प्रारंभी संघाचे अध्यक्ष श्री. गजाननराव गंगापूरे यानी उपस्थितांचे स्वागत करुन लोकमान्य टिळक व आण्णाभाऊ साठे यांच्या कार्याबाबत माहिती दिली.
संघाचे सदस्य श्री .आणाप्पा शेळके याच्या हस्ते लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेचे तसेच सदस्य श्री . श्रीकांत कांबळे यांच्या हस्ते आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सर्वानी या थोर विभूतीनांअभिवादन केले .
या कार्यक्रम प्रसंगी संचालक श्री. जयवंतराव हावळ यानी लोकमान्य टिळक आणि आण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यचा थोडक्यात आढावा घेतला.
या कार्यक्रमास संघाचे उपाध्यक्ष श्री. पी. डी. मगदूम, सचिव श्री.सखाराम सावर्डेकर, खजानीस श्री. शिवाजी सातवेकर , संचालक सर्वश्री सिकंदर जमादार, गणपती सिरसेकर, रणजीतसिंह सासणे, रंगराव चौगले, अशोक डवरी, महादेवराव वागवेकर, सदाशिव एकल, सदस्य तुकाराम भारमल, यांच्यासह जेष्ठ नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. शेवटी आभार श्री. पी. आर. पाटील यानी मानले.