पिंपळगाव खुर्द : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन यांची स्वायत्त संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे विभाग कोल्हापूर यांच्या वतीने संविधान साक्षरता अभियान अंतर्गत श्री.दौलतराव निकम हायस्कूल व्हन्नूर या ठिकाणी व्याख्यान आयोजित केले होते.
यावेळी प्रमुख वक्ते म्हणून प्रा. बबलू कांबळे बोलताना त्यांनी समता,स्वातंत्र्य,न्याय व बंधुत्व या नितीमुल्यावर आधारित जगातील सर्वात विस्तृत व लिखित राज्यघटना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केली.
जगातील सर्व घटनांचा अभ्यास करून तयार केलेली घटना इंडिया म्हणजे भारत हे पहिले कलम विविध जाती,धर्म व प्रांत या विविधतेत एकता निर्माण करते.घटनाकारांनी संविधानाचे प्रास्ताविक तयार करताना आम्ही भारताचे लोक व स्वतःप्रत अर्पण करीत आहोत म्हणजे लिहलय भारतीय लोकांनी आणि भारतीय लोकांनीच अर्पण केलय म्हणजे हा देश लोकशाहीचा आहे हे दर्शवतो असे मत व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक बार्टी समता दुत किरण चौगुले यांनी संविधान साक्षरता अभियान अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची माहिती तसेच बार्टी मार्फत विविध योजना यांची माहिती दिली. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन एम.जी.मोरे यांनी केले.
यावेळी अध्यक्ष व्ही. जी. पोवार, एस. बी. पाटील, जे. एन. सावंत, बी. जी. बोराटे, आर.व्ही.इंगवले, एस.आर.गुरव, ए.ए.पोवार, जे.बी.वैराट, एस. के. तिकोडे, एन. सी. यादव, बी. बी. खाडे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन बार्टी चे महासंचालक मा. धम्मज्योती गजभिये कोल्हापूर समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त मा. विशाल लोंढे कोल्हापूर जिल्हा प्रकल्प अधिकारी मा. गणेश सवाखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.