मुरगुड ( शशी दरेकर ) : सानिका स्पोर्टस् फौंडेशन मुरगुड यांच्या वतीने मुरगूड चे माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या मुरगुड प्रिमियम लिग क्रिकेट स्पर्धेतील प्रथम क्रमांक लाल आखाडा संकुल मुरगुड ने पटकावला तर द्वितीय क्रमांक डंग्या स्पोर्टस् मुरगुडने तर तृतीय क्रमांक आराध्या, चतुर्थ क्रमांक आर जे ग्रुप मुरगुड ने मिळवला.
क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन मुरगूड पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांच्या शुभहस्ते तर श्री. लक्ष्मीनारायण पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन श्री . किशोर पोतदार, श्री .व्यापारी नागरी पतसंस्थेचे चेअरमन श्री. किरण गवाणकर, निवास कदम, पांडुरंग कुडवे यांच्या प्रमुख उपस्थिती पार पडला. तर बक्षीस वितरण गोकुळचे मा. चेअरमन रणजितसिंह पाटील शाहू सहकार साखर कारखानाचे व्हा. चेअरमन मा.अमरसिंह घोरपडे, राजे बँकेचे चेअरमन मा. एम. पी .पाटील, शाहू साखर कारखान्याचे संचालक मा .सुनील मगदुम, बिद्रीचे मा. व्हा चेअरमन दत्तामामा खराडे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटील, मा. नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके, मा.उपनराध्यक्ष संतोषकुमार वंडकर ,सावर्डेचे सरपंच प्रताप पाटील, संजय चौगुले, दिगंबर अस्वले, विलास गुरव, अनंत फर्नाडिस, प्रवीण चौगुले आदी उपस्थित होते . स्वागत पांडुरंग कुडवे, प्रास्ताविक दगडू शेणवी तर आभार राजू चव्हाण यांनी मानले .
या स्पर्धामध्ये मॅन ऑफ द सिरीयल समाधान बोते, मॅन ऑफ द मॅच गणेश तोडकर, बेस्ट बॅट्समन रजत चौगुले, बेस्ट बॉलर आकाश जगताप, बेस्ट फिलडर ओंकार निढोरीकर हे मानकरी ठरले. यावेळी संयोजक रतन जगताप, निशांत जाधव, अरविंद नरके ,सागर सापळे ,विजय मेंडके ,आशिष फर्नांडिस, जगदीश चितळे, रणजीत बरकाळे, सुहास शेणवी, बापू कळमकर ,सुरज मुसळे ,मयूर पोतदार, रंजीत बरकाळे .तर स्पर्धेसाठी पंच म्हणून रमेश वाइंगडे, संजय वारके, महेश पुरीबुवा तर स्कोरर आदित्य शेणवे, सर्वेश पोतदार यांनी काम पाहिले .स्पर्धेचे समालोचन जावेद शिकलगार, बाळासो मनेर यांनी केले .