मडिगले(जोतीराम पोवार): वाघापूर तालुका भुदरगड येथील वाघापूर हायस्कूल चा विद्यार्थी केदार सागर दाभोळे याने नुकत्याच झालेल्या एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षेत 115 गुण मिळवून यश संपादन केले.
या यशासह तो महाराष्ट्र शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेस पात्र ठरला असून त्याला विषय शिक्षक चंद्रकांत वड्ड यांच्या मार्गदर्शनासह मुख्याध्यापक डी पी पाटील, वाय.बी. शिंदे, व्ही व्ही कुराडे, ए. एम .शेंडगे, गीतांजली पाटील, सरिता गुरव, संग्राम परीट, मायाप्पा डोणे, जोतीराम कुंभार त्यांचे बहुमोल सहकार्य लाभले त्याच्या या यशाबद्दल परिसरातून त्याचे कौतुक होत आहे