मुरगूडच्या गणराज तरुण मंडळाने सादर केला कराओके संगीताचा कार्यक्रम

मुरगूड ( शशी दरेकर ) –
मुरगूड ता. कागल येथील श्री. गणराज तरूण मंडळाच्या वतीने कराओके संगीताचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. प्रथमतः रात्री आठ वाजता श्री. गणरायाची आरती मुरगूडचे नगराध्यक्ष श्री. राजेखान जमादार, माजी नगरसेवक श्री. सुनिल रणवरे, औंकार दरेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आली. त्यानंतर ” कराओके ” संगीताच्या कार्यक्रमात अभियंता आकाश दरेकर, विनायक रणवरे, महादेव गोंधळी, जयवंत गोंधळी, प्रांजली रणवरे या गायकानी हिन्दी व मराठी गीत आपल्या मधूर आवाजानी महिला व नागरिकाना मंत्रमुग्ध केले, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्ष गणराज तरुण मंडळाने एकदम शांततेत कार्यक्रमाचा गाजावाजा न करता गणेत्सोव साजरा केला, पण यंदा शासनाचे सर्व नियम पाळून या मंडळाने हा कार्यक्रम आयोजित केल्यामुळे रासिक श्रोत्यानी दाद देऊन मंडळाचे भरभरून कौतूक केले .

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!