कागलचे नुतन पोलिस निरीक्षक संजय गोरले यांचा शिवसेनेमार्फत सत्कार

कागल चे नुतन पोलिस निरिक्षक संजय गोरले यांचा सत्कार करतांना शिवसेना तालकुाप्रमुख अशोकराव पाटील (बेलवळेकर), अॅड.पी.आर.सणगर,अशोकराव ससे,आनंदा मगदूम आदी. छाया : सागर लोहार,.साके.


साके (सागर लोहार) : कागल पोलिस स्टेशन चे नुतन पोलीस निरीक्षक म्हणून संजय गोरले यांनी नुकताच पदभार स्विकारला आहे त्याबद्द त्यांचा कागल तालुका शिवसेना – युवासेनेच्या वतीने तालुका प्रमुख अशोक पाटील (बेलवलेकर) यांचे हस्ते शिवसैनिकांच्या उपस्थीत पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी सत्कारा उत्तर देतांना नुतन पोलिस निरिक्षक संजय गोरले म्हणाले, सामाजिक बांधिलकीतून सर्वच पक्ष संघटना सामाजिक कार्यकर्ते ,नेते मंडळी यांनी समाजात कायदा आणि सुव्यवस्था चांगली राहण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे. पोलिस आणि नागरिक यांच्या समनवयातून नेहमीच संवाद ,भेटीगाठी वाढविल्यास समाजातील वाढती गुन्हेगारिचे प्रमाण कमी होवून पोलिस आणि सामान्य नागरिक यांच्यातील आपुलकीचा सलोखा वाढेल यातून समाजात चांगले परिवर्तन होण्यास मदत होईल असे त्यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी साह्यक पोलिस निरिक्षक दिपक वाकचोरे,कागल शहर शिवसेना शहर प्रमुख अॅड.पी.आर.सणगर, उपशहरप्रमुख प्रभाकर थोरात,वैभव आडके,उत्तम पाटील,विकास पाटील,अशोकराव ससे, सैारभ पाटील,वैभव पाटील,आनंदा मगदूम,पत्रकार सागर लोहार,विलास चव्हाण आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थीत होते.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!