
कागल : येथील ज्युनिअर कागलकर राजघराण्यातील संयोगिताराजे अजितसिंहराजे घाटगे (वय ९३) यांचे निधन झाले. येथील श्री शिवराय शिक्षण प्रसारक मंडळ, कागलचे अध्यक्ष मृगेंद्रसिंहराजे घाटगे यांच्या त्या आई, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक व अखिलेशराजे घाटगे यांच्या त्या आजी होत.
शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, माजी आमदार अमल महाडिक, माजी , आमदार संजय घाटगे, वीरेंद्रसिंह घाटगे, स्वरूप महाडिक, तसेच सावंतवाडीकर सरकार, नेर्लीकर सरकार, खानविलकर सरकार, दत्तवाडकर सरकार यांच्या उपस्थितीत त्यांच्यावर येथील कागल येथील खासबाग परिसरात अंत्यसंस्कार करण्यात आले.
रक्षाविसर्जन रविवार, दि. १३ रोजी सकाळी १० वाजता आहे.