फुटपाथवरील अतिक्रमणावर कागल नगरपरिषदेचा हातोडा


कागल(प्रतिनिधी) : कागल नगरपरिषदे कडून एसटी स्टॅन्ड परिसरातील दुकानदारांची फुटपाथवरील अतिक्रमण काढण्याची जोरदार मोहीम मंगळवारी १७ ऑगस्ट रोजी राबविण्यात आली.

Advertisements

यावेळी काही दुकानदारांची फुटपाथवरील बेकायदेशीर बांधकामे व पत्राचे शेड नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून काढण्यात आले आणि त्यातून फुटपाथ मोकळा झाला त्यावेळी दुकानात खरेदीसाठी आलेल्या ग्राहकाची गाडी त्या फूटपाथवर पार्क केली जाऊन मुख्य रस्ता मोकळा झाला. नगरपरिषदेचे आरोग्य निरीक्षक नितीन कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मोहीम राबवली. यावेळी काही दुकानदारांनी या मोहिमेबाबत नाराजी व्यक्त केली.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!