कागल / प्रतिनिधी : कागल विधानसभा मतदार संघात किरकोळ प्रकार वगळता मतदान प्रक्रिया शांततेत व उत्साहात पार पडली. कागल विधानसभा मतदारसंघात सरासरी 81 टक्के मतदान झाले. मतदारा च उत्साह असल्याने सायंकाळी उशिरापर्यंत मतदान केंद्रावर मतदान शांततेत चालू होते.
मतदारसंघात मतदान करण्यासाठी सकाळपासूनच चुरस दिसत होती. मतदान केंद्रासमोर महिलांच्या रांगा अधिक होत्या. लिंगनूर दुमाला येथील मराठी शाळेच्या समोर रस्त्यावर किरकोळ वादावादीने दोन गटात शाब्दिक चांगली जुंपली होती. मतदार राजा उत्साही वातावरणात मतदाना साठी केंद्राकडे जात होता. सकाळच्या सत्रात कागल तालुक्याच्या पूर्व भागात तीस ते पस्तीस टक्के मतदान झाले होते. मतदाराने केंद्राबाहेर गर्दी केली होती .
राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी लिंगनूर दुमाला येथील मराठी शाळेच्या केंद्रात जाऊन मतदानाचा पवित्र हक्क बजावला मंत्री मुश्रीफ यांनी रांगेत उभा राहून नंबराणे जाऊन मतदान केले .पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, कागल विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. मतदारात एक जबरदस्त उत्साह आहे .त्यामुळे हसन मुश्रीफ यांना निवडून आणण्याची लाट आली आहे .असे सांगत या निवडणुकीत आपण विजय होणार असल्याचेही त्यांनी सांगितले
ग्रामीण भागात महिला मजूर व एम आय डि सी येथील नोकरीसाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सकाळीच मतदान करणे पसंत केले. सकाळपासूनच केंद्रबाहेर मतदारांनी रांगा लावल्या होत्या मतदारांना आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. लिंगनूर दुमाला येथील सावित्री विठ्ठल कांबळे या 85वर्षाच्या वृद्ध महिलेने मतदानाचा हक्क बजाविला. तिला सन्मानपत्र देऊन जिल्हाधिकरणी गौरविण्यात आले.
मौजे सांगाव येथील पशुवैद्यकीय दवाखाना व जिल्हा परिषद शाळेतील केंद्रावर लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या .करवीर उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रसाद चौगुले व कागलचे गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे यांनी मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली . वृद्ध महिला मतदारांना रांगेत उभं न राहता तात्काळ मतदान करून घेण्याच्या सूचना संबंधित अधिका-यांना दिल्या.
मंत्री मुश्रीफ यांनी कागल सर लिंगनूर, सांगाव, सुळकुड, सिध्दनेर्ली आदी गावांसह संपूर्ण मतदारसंघात फेरफटका मारला. कसबा सांगाव येथील दादासो मगदूम हायस्कूल व प्राथमिक शाळेत मतदारांनी गर्दी केली होती.
कागल येथे संत रोहिदास शाळेत कागल नगरपालिकेने थिम केंद्र उभारले होते. कागलचा सांस्कृतिक वारसा जपणारे व कलाविष्काराने कागल चे नाव उज्वल करणाऱ्या कलाकारांचे फोटो पडद्यावर साकारून त्यांचा सन्मान राखला. हरिजन वसाहत येथे शाहू उद्यान समोर आदर्श मतदान केंद्र उभारून मतदारांना चांगलीच भुरळ पाडली .या ठिकाणी काही महिलांना सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही .याच पद्धतीने तालुक्यात विविध ठिकाणी नामांकित थीम केंद्रे उभारून मतदारांना आकर्षित करण्यात आले.
मतदानाची वेळ सायंकाळी संपल्यानंतर घाटगे व मुश्रीफ गटाने विजयाचा दावा केला आहे. तर मुश्रीफ गटांने फटक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला.