निढोरीतील सेवानिवृत्त जवानाचे अपघाती निधन

मुरगूड ( शशी दरेकर ) : निढोरी ता. कागल येथील सेवानिवृत्त फौजी आणि छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना कागल मधील सुरक्षा विभागाकडील सेवानिवृत्त अधिकारी विठ्ठल हरि मगदूम ( वय ६१ वर्षे )यांचे अपघाती निधन झाले. आय.टी.बी.पी. पोलिस निलेश मगदूम यांचे ते वडील आणि आंतरराष्ट्रीय मल्ल व नामवंत कुस्ती निवेदक मारुती तथा बटू जाधव (गंगापूर) यांचे ते दाजी होत. अपघाताची नोंद मुरगुड पोलिसात उशिरा झाली नव्हती.

Advertisements

       मंगळवारी सकाळी ते निढोरी – कागल रस्त्यावरून आपल्या सायकलने शेताकडे चालले होते. यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात मोटरसायकलस्वाराने  जोराचा धक्का दिला. यामुळे मगदूम यांना गंभीर दुखापत झाली. जखमी अवस्थेत त्यांना कोल्हापूरच्या सीपीआर इस्पितळात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी उपचाराची शर्थ केली. तथापी उपचार चालू असताना दुर्दैवाने बुधवारी पहाटे विठ्ठल मगदूम यांची प्राणज्योत मालवली. शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुलगी असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज गुरुवार दि. २१ रोजी सकाळी ९ वा. निढोरी ता. कागल येथे आहे.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!