कोल्हापूर : जवाहर नवोदय निवासी विद्यालयात सन 2023-24 साठी इ. 6 वी साठी होणारी प्रवेश परीक्षा शनिवार दि. 29 एप्रिल 2023 रोजी प्रत्येक तालुक्याच्या प्रमुख परीक्षा केंद्रांवर होणार आहे. परीक्षेचे ऑनलाईन अर्ज विद्यार्थ्यांच्या पालकांनी www.navodaya.gov.in या संकेतस्थळावर 31 जानेवारी 2023 पर्यंत करावेत, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्यांनी केले आहे.
Advertisements
परीक्षेचे अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आली आहे. जिल्ह्यातील इयत्ता 5 वी च्या वर्गात शिक्षण घेणारे विद्यार्थी या परीक्षेसाठी अर्ज करु शकतात. अधिक माहितीसाठी 02325-244197 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
Advertisements

AD1