मुरगूडमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या २२फुटी मूर्तीची प्रतिष्ठापना

मुरगूड (शशी दरेकर) : छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समितीच्यावतीने येथील चौकात छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्यदिव्य अशा २२फुटी मूर्तीची प्रतिष्ठापना उत्साही वातावरणात करण्यात आली.

Advertisements

आंतरराष्ट्रीय प्रवचनकार डॉ़ श्रीकृष्ण देशमुख यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या २२फुटी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी विरेंद्र मंडलिक, उद्योगपती बाबा जांभळे, साहिल ढमाले, देवदत्त गंगावनवाले, अॅड सुधीर सावर्डेकर प्रमुख उपस्थित होते .

Advertisements

छत्रपती संभाजी महाराज पुतळा प्रतिष्ठापन प्रसंगी संभाजी महाराजांच्या जयजयकाराच्या घोषणा, विद्युत रोषणाई व पुष्पवृष्टी ‘ फटाक्यांची आतषबाजी यावेळी करण्यात आली .

याप्रसंगी बोलताना डॉ. श्रीकृष्ण देशमुख म्हणाले, धर्मवीर संभाजी महाराजांची प्रेरणा नव्या पिढीला मिळून त्यांच्याकडून सत्कार्य घडेल विधायक दृष्टीकोनातून ते समाजाला पुढे नेतील.

अॅड विरेंद्र मंडलिक म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वांना परिचित आहे तसा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जनतेसमोर आणण्याची गरज आहे. त्यांच्या विषयी व्याख्यानांचे आयोजन महत्वाचे आहे.

प्रदीप वर्णे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष पांडुरंग भाट, माजी नगरसेवक, मारुती कांबळे आनंदा मांगले ,सजैराव पाटील, मयूर आंगज, नवनाथ सातवेकर, डॉ. भीष्म सुर्यवंशी, बजरंग सोनुले आदि उपस्थित होते . अनिल पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर रोहीत कोळेकर यांनी आभार मानले.

Leave a Comment

error: Content is protected !!