कागल एज्युकेशन सोसायटी संचालित वाय. डी. माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, कागल येथे नवीन शैक्षणिक वर्षाचे स्वागत इंडक्शन, ओरिएंटेशन आणि फ्रेशर्स पार्टीच्या उत्साही कार्यक्रमांनी करण्यात आले. महाविद्यालयात प्रथम वर्षात प्रवेशित B. Pharm, Direct Second Year आणि D. Pharm विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम विशेषतः आयोजित करण्यात आला. पालकांची उत्स्फूर्त उपस्थिती ही कार्यक्रमाची शोभा वाढवणारी ठरली.
👉कार्यक्रमास कॅम्पस डायरेक्टर सौ. शिल्पा पाटील, प्राचार्य डॉ. सतीश कल्लुरी व डिप्लोमा विभाग प्रमुख सौ. हीना पटेल यांसह महाविद्यालयातील विविध विभागप्रमुखांची मान्यवर उपस्थिती लाभली. प्राचार्य डॉ. सतीश कल्लुरी यांनी महाविद्यालयाचा इतिहास, ध्येय-धोरणे, सुविधा, संशोधनसंधी आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध करिअर मार्गांची ओळख करून दिली.
👉इंडक्शन व ओरिएंटेशन कार्यक्रमाचे आयोजन सहाय्यक प्राध्यापक सौ. प्रगती पाटील व सौ. निकिता भोसले यांनी केले. शैक्षणिक प्रभारी श्री. वी. मुरलीधरम यांनी महाविद्यालयाची शिस्त, नियमावली व आचारसंहिता याबाबत मार्गदर्शन केले, तर परीक्षा प्रभारी डॉ. निलेश देसाई यांनी परीक्षा प्रक्रिया, मूल्यांकन पद्धती आणि उच्चशिक्षणाच्या संधींविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. सहप्राध्यापक सौ. प्रीति हुलस्वार यांनी पाठ्यक्रमीय व पाठ्यक्रमाबाह्य उपक्रमांचे महत्त्व स्पष्ट केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सुबक सूत्रसंचालन सहाय्यक प्राध्यापक सौ. दीक्षा कांबळे यांनी केले.
👉यानंतर 21 नोव्हेंबर 2025 रोजी आयोजित फ्रेशर्स पार्टीने संपूर्ण कॅम्पस जल्लोषमय झाला. कार्यक्रमादरम्यान कॅम्पस डायरेक्टर सौ. शिल्पा पाटील यांचा प्राचार्य डॉ. सतीश कल्लुरी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश देत त्यांच्या महाविद्यालयीन प्रवासासाठी सकारात्मक दृष्टीकोनाची दिशा दिली.
रॅम्प वॉकने कार्यक्रमाला रंगत आली, तर सीनियर विद्यार्थ्यांच्या नृत्य व संगीताच्या सादरीकरणांनी उत्साहाचा उधाण आले. नवीन विद्यार्थ्यांना परस्परांमध्ये मैत्रीपूर्ण वातावरण तयार व्हावे यासाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले.
विशेष लाईटिंग व सजावटीने सजलेले सभागृह फ्रेशर्स पार्टीची शोभा अधिक खुलवणारे ठरले. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी डिनरचे आयोजन करण्यात आले.
कॅल्चरल इनचार्ज सुप्रिया कोरे, शुभम पाटील तसेच B. Pharm आणि D. Pharm द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रभावी नियोजन व मार्गदर्शन केले.
या सोहळ्यात Ms. Fresher म्हणून सौंदर्या वकडे, तर Mr. Fresher म्हणून शेखर चव्हाण यांची निवड करण्यात आली.
संपूर्ण कार्यक्रमास संस्थेचे सचिव श्री. प्रताप उर्फ भैय्या माने, उपाध्यक्ष श्री. सुनील माने, संचालक श्री. बिपिन माने आणि कॅम्पस संचालिका सौ. शिल्पा पाटील यांचे सतत प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळाले.
या उपक्रमातून नवागत विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन वातावरण, शैक्षणिक पद्धती, सांस्कृतिक उपक्रम आणि भावी संधींची योग्य ओळख मिळाली.
वाय. डी. माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, कागल मध्ये इंडक्शन, ओरिएंटेशन व फ्रेशर्स पार्टी उत्साहात संपन्न
Advertisements
AD1