सुरुपलीत सलग तीन दिवस तीन चोऱ्या, परिसारत घबराट
मुरगूड ( शशी दरेकर) : सुरुपली व सोनगे येथे बंद घराची कुलपे तोडून अज्ञात चोरट्यांनी किमती ऐवज लंपास केला आहे सुरुपली येथे एल इ डी टीव्ही,चांदीच्या अंगठ्या व रोख रक्कम असा सुमारे एक लाखाचा मुद्देमाल चोरीस गेला असून सोनगे येथील घर मालक बाहेर गावी गेले असल्याने कितीचा जिन्नस गेला आहे हे समजू नाही दरम्यान सुरुपली येथे गेल्या तीन दिवसात तीन ठिकाणी चोऱ्या झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे मुरगूड पोलिसांनी रात्रीची गस्त सुरु करावी अशी लोकाच्यातून मागणी होत आहे.मुरगूड पोलिसात चोरीची नोंद झाली आहे
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की सुरुपली ता.कागल येथे सुशांत सुर्यकांत पाटील हे गेल्या दोन दिवसापासून बाहेरगावी पाहुण्याच्या कडे गेले होते त्यामुळे घर कुलुपबंद होते नेमके हे बंद घराचे कुलूप तोडून घरातील ५० इंची एल.इ.डी.टीव्ही ,रोख सहा हजार आणि चांदीच्या अंगठ्या व अन्य ऐवज असा सुमारे एक लाखाचा मुद्देमाल चोरीस गेला असल्याचे समजते यावेळी घरातील संसारउपयोगी साहित्य विस्कटून टाकले होते.मुरगूड पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते.चोरीच्या घरापासून शंभर फुटावर घुटमळले.
दरम्यान सुरूपली येथे मुरगूड निपाणी रस्त्याकडेला लावलेली मोटरसायकल अज्ञातानी करून नेली आहे तर दुसऱ्याच दिवशी मुरगूड निपाणी मार्गावरील सुरुपली च्या भावेश्वरी मंदिराचे कुलूप तोडून मूर्तीच्या गळ्यातील दागिनेही चोरीस गेले आहेत तर काल रात्री बंद घराचे कुलूप तोडून चोरी झाली आहे त्यामुळे गावात भितीचे वातावरण पसरले आहे.
सोनगे येथील जम्मू काश्मीर येथे देशसेवेत असणारे दत्तात्रय गणपती तांबेकर यांचे बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी चोरी केली आहे मात्र या चोरीत नेमकी कशाची चोरी झाली हे समजू शकले नाही सोन्याचे मोठे जिन्नस व रोख रक्कम चोरीस गेली असल्याची चर्चा गावात होती.दरम्यान चोरांनी गेल्या तीनचार दिवसापासून घातलेल्या धुमाकूळ मुळे भीतीचे वातावरण पसरले आहे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी होत असून नागरिकांनीही सतर्क राहण्याची गरज आहे .